डेस्क ऑफिसरनं मान्यता न घेताच हे परिपत्रक काढलं होतं. हा सरकारचा आदेश नव्हता. त्यामुळं 25 जानेवारी रोजीच हे परिपत्रक रद्द करण्यात आलं आहे. तरीही कुठलीही माहिती न घेता 26 जानेवारीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी यावर भाष्य केलं.
त्यामुळं शिवसेनेचे मंत्री, आमदार उद्धव ठाकरेंना चुकीची माहिती देत असल्याचा आरोपही तावडेंनी केला.
आज शिवसेनेच्या नेत्यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे परिपत्रक मागे घेतल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली होती.
काय आहे प्रकरण?
मंत्रालयासह विविध सरकारी कार्यालयात लावलेले धार्मिक फोटो सन्मानाने बाहेर काढण्याचं परिपत्रक राज्य सरकारने काढलं आहे. या परिपत्रकामुळे शिवसेना मंत्र्यांमध्ये सरकारच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी पसरली आहे.
2002 मध्ये आघाडी सरकारने पहिल्यांदा यासंदर्भात परिपत्रक काढलं होतं. पण हा आदेश राबवण्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने आग्रही भूमिका घेतली नव्हती. जे आघाडी सरकारला जमलं नाही, ते हिंदुत्ववादी सरकारने करुन दाखवल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी होती.
संबंधित बातम्या