मुंबई: "शिवसेना आता सुसाट सुटली आहे.स्वबळावर महाराष्ट्राची सत्ता मिळवणं हा शिवसेनेचा थांबा आहे, असं  शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. ते एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात बोलत होते.


राज्य सरकारमधून बाहेर पडणार का, या प्रश्नावर 'वेट अँड वॉच" असं म्हणत, संजय राऊत यांनी शिवसेना-भाजपच्या भविष्यातील वाटचालीबाबतचे संकेत दिले.

मुंबई महापालिकेसह राज्यातील मनपा आणि जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळावर लढण्याचं सांगत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची युती तुटल्याची घोषणा गुरुवारी केली.

त्या पार्श्वभूीवर संजय राऊत यांनी 'माझा कट्टा'वर शिवसेनेची भूमिका मांडली.

जनतेच्या खदखदीमुळे युती तोडली

भाजपसोबतची युती तोडावी, ही जनतेची भावना होती. महाराष्ट्राच्या तळमळीपोटी युती होती. मात्र जनेतेची आणि शिवसैनिकांची युतीमुळे खदखद झाली, त्यामुळेच जनतेच्या मनातील कडवट निर्णय उद्धव ठाकरेंनी जाहीर केला आणि भाजपसोबतची युती तोडली, असं संजय राऊत म्हणाले.

सेनेला गिळण्याचा भाजपचा डाव उधळला
शिवसेना-भाजपची युती ही विचाराने झाली होती. मात्र आज विचारापेक्षा सत्तेला आणि संपत्तीला महत्त्व आहे. भाजपची प्रत्येकवेळी ओरबडण्याची भूमिका होती. शिवसेनेला गिळण्याचा भाजपचा डाव होता, तो आम्ही उधळून लावला, असं संजय राऊत म्हणाले.

भाजपला युती तोडायची होती

भाजपने शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर, लालबाग परळ, गिरगाव इथल्या जागा मागितल्या. यावरुनच भाजपला युती तोडायची होती, हे स्पष्ट झालं होतं, असंही राऊत यांनी नमूद केलं.

'माझं ते माझं, तुझं तेही माझ्या बापाचं'
कोणत्याही निवडणुकीत माझं ते माझं, तुझं तेही माझ्या बापाचं हीच भाजपची भूमिका होती. भाजपची प्रत्येकवेळी ओरबडण्याची भूमिका होती.

भाजपने देशभरात ज्यांच्याशी युती केली, त्या छोट्या पक्षांना गिळलं, मात्र शिवसेनेने त्यांचा हा डाव हाणून पाडला, असं राऊत यांनी नमूद केलं.

फडणवीस चांगला माणूस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा माणूस संयमी आहे. त्यांच्याबद्दल आम्ही सकारात्मक आहोत. मात्र युतीबाबत ते हतबल झाले असावेत, त्यांच्या हातात काही नसावं, असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल सहानुभूती दाखवली.

ज्यांनी भाजपची साथ सोडली, ते मोठे झाले
ज्यांनी भाजपची साथ सोडली, ते मोठे झाले. ममता बॅनर्जी, जयलिलाता, नितीश कुमार, नवीन पटनाईक यांनी भाजपशी साथ सोडली आणि त्या त्या राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन केली.  हा इतिहास, त्याची पुनरावृत्ती शिवसेनेने केली, असं संजय राऊत म्हणाले.

राणे, पवार विरोधक नाहीत

नारायण राणे आणि शरद पवार हे शिवसेनेवर टीका करतात. मात्र ते काही विरोधक नाहीत, ते संधीसाधू आहेत. युती तुटल्यानंतर शरद पवार म्हणतात युतीबाबत विचार करु? मात्र तुम्ही कोणासोबत युती करणार हे सांगा, असं म्हणत राऊत यांनी पवार - राणे हे संधीसाधू आहेत, विरोधक नाहीत असा टोला हाणला.

संगमांसोबत  सन्मान, हा पवारांचा अपमान

पी ए संगमा यांच्यासोबत शरद पवारांना पद्मविभूषण म्हणजे तो त्यांच्या सन्मान नाही तर अपमान आहे, अस संजय राऊत म्हणाले. पी ए संगमांचं काम तितकंसं मोठं नाही. संगमा हे शरद पवारांच्या पक्षात होते. त्यामुळे पवारांच्या हाताखाली काम करणाऱ्या नेत्याला त्यांच्यासोबत पुरस्कार म्हणजे हा पवारांचा अपमान आहे, असं राऊत म्हणाले.

कोण सोमय्या, कोण आव्हाड?

यावेळी संजय राऊत यांनी भाजप खासदार किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली.

सोमय्या हे भाजपच्या निर्णयप्रक्रियेत नाही, त्यामुळे सोमय्या कोण, त्यांना ओळखत नाही, असं राऊत म्हणाले.

तर जितेंद्र आव्हाडांनी शिवसेनेवर बोलण्याऐवजी राष्ट्रवादी आणि भाजपच्या संबंधांबाबत बोलावं, असं राऊत यांनी नमूद केलं.

आव्हाडांनी मुंब्र्यातील इशरत जहाँ या मुलीला संत ठरवलं, त्यांनी शिवसेनेवर टीका करु नये असा टोला राऊतांनी लगावला.

मझा कट्टावरील महत्त्वाचे मुद्दे

भाजपच्या ओरबडण्याच्या वृत्तीवर बाळासाहेबांनी आसूड ओडले होते.

केंद्रातल्या सत्तेला अर्थ नाही, भाजपचं बहुमत

राज्यात भाजपचे सर्वाधिक आमदार. राजकीय अस्थिरता आले तर आर्थिक अस्थिरता येते. त्यामुळे राज्यात सरकारला पाठिंबा

राणे, पवार यांना आम्ही विरोधक मानत नाही. पवार भाजपला पाठिंबा द्यायला निघाले होते...ते संधीसाधू आहेत.
काल राष्ट्रवादीचं पहिलं स्टेटमेंट ,...युतीबाबत आम्ही बोलणं करु..म्हणजे कुणाशी

काल शिवसेना मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही बॅगा भरुन तयार आहोत..

आम्ही सत्तेत नाही..आम्ही लढवय्ये...सत्ता मिळाली तर हवी, मिळाली नाही तर रडत बसणार नाही...सत्तेत असलो तरी माज नाही, जिथे चुकेल तिथे ठोकू

आदेश आला तर सत्तेतून बाहेर पडू....निर्णय झाला तर बाहेर पडू....10-5 मंत्र्यांसाठी सत्तेला चिकटून राहणार नाही

शिवसेनेचे सर्व नेते उद्धव ठाकरेंच्या पाठिशी....सत्तेमध्ये असूनही आम्ही रस्त्यावर..

सत्तेतून उतरल्यावर आम्ही मोकळा श्वास घेऊ

महापालिकेत आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल....मोदी पंतप्रधान होतील हे कुणाला वाटलं नव्हतं

फडणवीस हे मुख्यमंत्री अजूनही खरं वाटत नाही

खडसेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं...

मी मनपा, जिपी निवडणुकीत पडलो नाही...आमची मुंबईची

शिवसेनेच्या विजयानंतर कडकडाट होईल

किरीट सोमय्यांना ओळखत नाही

प्रत्येक वेळी भाजपनेच कडवटपणा का घ्यायचा

युती तोडण्याची भूमिका भजापची होती..

मुंबईवर शिवसेनेची सत्ता हवी, ही जनतेची भूमिका

मुंबईबाबत शिवसेना कधीही बचावाची भूमिका घेणार नाही...पंजा मारु

वार झेलण्यासाठी शिवसेनेचा जन्म

भाडोत्री गुंड कांग्रेसमध्ये होते, राष्ट्रवादी मग आता भाजपमध्ये आले, सत्ता असेल तिथे गुंड जातात

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काळात पोलीसांना घाबरलो नाहीत..आता काय घाबरणा

कचरा, नालेसफाई घोटाळा झाला नाही....

फालतू लोक आरोप करतात, त्याची री ओढू नका

मी मनपा तज्ज्ञ नाही....मुंबईतील प्रश्न सुटले...त्याशिवाय मुंबई चालतीय का

कोणीही उठून कागद ठेवतं, तुम्ही उठतं

आम्ही महाराष्ट्राचे....कोण किरीट सोमय्या निर्णय प्रक्रियेतील नाही...सोमय्या सेनेच्या पाठिंब्यावर निवडून आले...पाठिंबा काय हे आगामी लोकसभा निवडणुकीत कळेल

सगळे आमच्या बरोबर...गुजराती, यूपी

पैसे असल्यामुळे जाहिरात करतात...

मोदींवर व्यक्तीगत टीका केली नाही...धोरणात्मक टीका केली..उदा. नोटबंदी

चंद्राबाबू, नितीश कुमारांनी नोटबंदीला पाठिंबा दिला नंतर कपाळ बडवलं

आम्ही सत्ता सोडू, पण भूमिका बदलणार नाही..

शिवसेनाप्रमुख हे पद अमर, बाळासाहेबांना पद्म पुरस्काराने लहान करु नका

कोण आव्हाड, त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं....शिवसेनेवर बोललं की मोठं होतं..

मुंब्र्यातील मुलीला संत ठरवणाऱ्या आव्हाडांनी शिवसेनेवर बोलू नये...

राष्ट्रवादीचे नेते भाजपशी चुम्माचुम्मी करतायेत....त्यावर आव्हाडांनी बोलावलं

आम्ही सर्व्हे वगैरे करुन निवडणुका लढवत नाही...

स्वबळावर महाराष्ट्राची सत्ता मिळवणं हा थांबा, वेट अँड वॉच

फडणवीस माणूस संयमी, त्यांच्याबद्दल आम्ही सकारात्मक, ते हतबल झाले असावेत, त्यांच्या हातात काही नसावं

दादर, लालबाग परळ, गिरगाव या जागा मागता म्हणजे भाजपला युती तोडायची होती.

दानवेंनी नोटाबदलीसाठी काऊंटर उघडलं

आवाज शिवसेनेची, वाघाची डरकाळी....विकास उद्धव ठाकरेंनी केली...मुंबईत मराठी माणसाचा आवाज नसेल, तर कुणाचा असेल....मराठी टक्का कमी झाला, पण शिवसैनिकांनी त्याला ताकद दिली.

भाजपने राजकारणात विष पेरलंय,,,,त्यांच्या जबड्यातून जे बाहेर पडले, ते मोठे झाले...शिवसेना शिखरावर पोहोचेल.

सत्ता हीच स्ट्रॅटेजी..शिवसेनेला गिळण्याचं भाजपचं मिशन फेल

युती रुजली होती..त्यातून बाहेर पडणं कमी होतं

शंभर लोकही कमळासोबत नव्हते..बाळासाहेाबांनी युती तयार केली

हिूंद असेल तर गुन्हा आहे का...

ईडी, सीबीआय, धाडी अशा दबावांना घाबरत नाही....तसं असतं तर उद्धवजींनी घोषणा केली नसती

आम्ही पाप केलं नाही...लोकांसाठी काम करतो...