मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या दहिसर येथील सभेनंतर स्थानिक माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या गाडीच्या टायरला संशयास्पदरित्या आग लागली. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली.


या घटनेत कोणालाही इजा नाही. शिवसेनेच्या माजी महापौर शुभा राऊळ आणि नगरसेविका शीतल म्हात्रे विरुद्ध घोसाळकर यांच्या अंतर्गत वादामुळे दहिसर मतदारसंघ चर्चेत होता. तरीही आज सर्व नेते एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले.

दहिसर येथील शिवसेनेचा अंतर्गत वाद 'मातोश्री'वर पोहचला होता.