मुंबई: ‘कल्याण-डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्री वाघाच्या जबड्यात हात घालायला गेले होते, अजून मांजरीच्या जबड्याला तरी हात घातला का?’ अशी बोचरी टीका नारायण राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. मुंबईतील प्रचारसभेत बोलताना राणेंनी भाजप आणि शिवसेना दोघांची खरपूस समाचार घेतला.


‘मुंबई ही सोन्याची अंड देणारी कोबंडी आहे. यासाठीच शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची मारामारी चालू आहे.’ असं म्हणत राणेंनी शिवसेना-भाजपवर निशाणा साधला.

दरम्यान, राणेंनी मुख्यमंत्र्यांसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका केली. ‘शिवसेनेनं मराठी माणसांसाठी काय केले? १९६६ साली मुंबईत मराठी माणूस ५२ टक्के होता. आज उद्धव ठाकरेंमुळे तो २२ टक्क्यांवर आला.’ असा आरोप राणेंनी केला.

काल सोलापूरमध्येही राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. महाभारताच्या नावाखाली महाराष्ट्रात नुसता तमाशा चालू आहे. मध्यावधी निवडणुकांचे संकेत देण्यापेक्षा शिवसेनेनं हिम्मत असेल तर सत्तेतून बाहेर पडावं. असंही राणे म्हणाले होते.

संबंधित बातम्या:

शिवसेनेनं सत्ता सोडण्याची हिम्मत दाखवावी: नारायण राणे

सत्ता स्थापण्यासाठी पुन्हा भाजपसोबत कदापि जाणार नाही : उद्धव ठाकरे

मुंबईत शिवसेनाच नंबर वन राहील : शरद पवार