Vikhroli Park Site Building Slab Collapse : मुंबईच्या पार्कसाईट विभागात रविवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसात एका निर्माणआधीन इमारतीच्या काही भाग कोसळल्याने (Mumbai Vikhroli Park Site Building Slab Collapse) दोघांचा मृत्यू झाला आहे. नागेश रेड्डी (वय 38) आणि रोहित रेड्डी असं त्यामध्ये मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. रोहित रेड्डी हा नागेश रेड्डी यांचा दहा वर्षांचा मुलगा आहे. या इमारतीच्या सुरक्षेबाबत मयतांच्या नातेवाईकानी तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे.


नागेश रेड्डी हे या इमारतीचे सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते. रात्री साडे अकराच्या सुमारास नागेश रेड्डी हे कामावर आले होते. तेव्हा त्यांचा दहा वर्षाचा मुलगा रोहित हा त्यांचा जेवणाचा डबा घेऊन तिकडे आला. परंतु जोरदार पाऊस पडत असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाला तिथेच थांबण्यास सांगितले. याच दरम्यान अचानक या इमारतीचा काही स्लॅब आणि लोखंडे ढाचा थेट त्यांच्या अंगावर कोसळला. या घटनेत या दोघांचा जागीच मृत्यू झाला.


अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 


उपचारापूर्वीच मृत्यू 


रविवारी रात्री उशिरा तळमजला धरून 4 माळ्याचं घर कोसळल्याची घटना घडली. यावेळी घराचा काही भाग कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे जवान पोहचण्यापूर्वीच दोघा जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 


मुंबईसह राज्यात मान्सून सक्रिय


राज्यभरात मान्सून सक्रिय झाला असून सर्वत्र पासून चांगला पाऊस होत असल्याचं चित्र आहे. मुंबईत रविवारी मान्सून झाला आणि संध्याकाळच्या सुमाराला पावसाने मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईत अनेक भागात जोरदार पाऊस झाला. संध्याकाळी मुंबईच्या सखल भागात पाणी साचलं होतं.


सकाळपासून पावसाने विलोकल आणि रस्ते वाहतूक सुरळीत सुरू आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांत जोरदार पाऊस सुरू आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाने 34 वर्षांचा रेकॉर्ड मोडला. पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातही चांगला पाऊस सुरू आहे. नद्या, ओढे नाले प्रवाही झालेत. शेतकरी सुखावला असून पेरणीच्या कामांना सुरूवात झालीय, तर जालन्यातही अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. 


ही बातमी वाचा: