मुंबई : मुंबईतील विक्रोळी स्थानकावर एका ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्येच्या प्रयत्न केला. दैव बलवत्तर म्हणून त्यांचा प्रयत्न फसला आणि ते बचावले. लोकलसमोर या इसमाने उडी घेतल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.


मुंबईतील मध्य रेल्वेवरील विक्रोळी स्थानकावर 65 वर्षीय दिनकर सकपाळ यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. स्टेशनमध्ये लोकल शिरत असतानाच त्यांनी तिच्यासमोर स्वत:ला झोकून दिलं. त्यांच्या अंगावरुन लोकलही गेली, मात्र सुदैवाने सकपाळ यांना साधं खरचटलंही नाही.



दोन रुळांमध्ये असलेल्या खडीच्या खड्ड्यात अडकल्यानं दिनकर सकपाळ यांचा जीव वाचला. मंगळवारी घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सकपाळ यांनी जीव देण्याचा प्रयत्न का केला, हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

पाहा व्हिडिओ :