देशात मुंबई महापालिकेचा कारभार सर्वात पारदर्शी आणि सक्षम
केंद्राच्या आर्थिक सर्व्हेमध्ये मुंबई महापालिकेचा कारभार देशात सर्वाधिक पारदर्शी आणि सक्षम असल्याचं समोर आलं. भाजपकडून पारदर्शकतेच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला टार्गेट केलं जातं. मात्र बुडत्याला काडीचा आधार असं म्हणत शेलारांनी पुन्हा एकदा शिवसेनेला टोला लगावला आहे.
आर्थिक सर्व्हे : विकास दर 6.75 ते 7.50 टक्के राहण्याचा अंदाज
कचरा घोटाळा, रस्ते घोटाळा हे भाजपचे आरोप आहेत, त्यांना शिवसेनेने उत्तर द्यावं उगीच पाठ खाजवून घेऊ नये, असं आव्हान शेलारांनी दिलं आहे.
देशाचा आर्थिक सर्व्हे म्हणजे काय?
काय आहे केंद्राचा आर्थिक अहवाल?
केंद्राच्या सर्व्हेमध्ये देशभरातील 21 महापालिकांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये मुंबई महापालिका आणि हैदराबाद महापालिकेने पारदर्शी कारभारात अव्वल क्रमांक मिळवला. चंदीगड महापालिकेला दुसरं, तर दिल्ली, कोलकाता आणि रायपूर महापालिकेला चौथं स्थान मिळालं आहे.
पायाभूत सुविधांमध्ये मुंबई, पुण्याची बाजी
पायाभूत सुविधांमध्ये मुंबई महापालिकेने देशात चौथं स्थान पटकावलं आहे. पुणे महापालिकेनेही पायाभूत सुविधा देण्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. तर हैदराबाद पहिल्या आणि चंदीगड तिसऱ्या क्रमांकावर आहे.