ठाणे :  माजीवाडा ते घोडबंदर रोड कासारवडवली, गायमुखपर्यंत काम सुरु राहणार आहे.  शुक्रवारी रात्री 11 ते शनिवार सकाळी 5 वाजेपर्यंत मेट्रो-4 चे गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला असून शुक्रवारी रात्री पासून शनिवारी सकाळपर्यंत कापुरबावडी जंक्शन येथे वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. 


मे  रिलायन्स अँस्टोल्डी जॉइंट व्हेंचर प्रा. लि . हि कंपनी मेट्रो-4 चे काम करीत आहे. हे मेट्रोचे गर्डर टाकण्यासाठी मुंबई, ठाणे कडून घोडबंदर रोडने जाणाऱ्या सर वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेशाला बंदी करण्यात आलेली आहे. तसेच मुंबई नाशिक महामार्गाने माजिवडा, कापूरबावडी, घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या जाड अवजड आणि इतर सर्व वाहनांना तत्वज्ञान विदयापीठ, कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. इच्छित स्थळी जाणाऱ्या वाहनं पर्यायी रस्ता म्हणून मुंबई नाशिक महामार्गाने माजिवडा, कापूरबावडी मार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड आणि अवजड वाहने ही कापूरबावडी सर्कल येथून उजवे वळण घेऊन बाळकूम नाका, भिवंडी, आग्रा रॉड, कशेळी, काल्हेर, अंजूरफाटा मार्गे किंवा माजिवडा उड्डाणपुला खालून यु टर्न घेऊन खारेगाव ब्रिज, माणकोली नका मार्गे इच्छित स्थळी जाता  येणार आहे.    


 या मेट्रोचे काम शुक्रवारी रात्री 11 ते शनिवारी सकाळी 5 वाजेपर्यंत गायमुख पर्यंत सुरु राहणार असून गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे हा वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे इतर वाहनांना कापूरबावडी जंक्शनकडे प्रवेशास बंदी असून यामध्ये फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, पोलीस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यातून सूट देण्यात आलेली असल्याची माहिती ठाणे वाहतूक उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.