नवी मुंबई : एपीएमसी भाजी मार्केट मध्ये गेल्या चार दिवसापासून भाजीपाल्याची आवक वाढू लागल्याने दर 40 ते 50 टक्क्यांनी उतरले आहेत. आज 630 भाजीपाला गाड्यांची आवक झाली आहे. गेल्या महिनाभरात चढे असलेले दर आता उतरण्यास सुरवात झाली आहे. नविन आलेला भाजीपाला अनलॉक सुरू झाल्यामुळे एपीएमसीमध्ये महाराष्ट्रबरोबर परराज्यातूनही भाजीपाला आवक येण्यास सुरवात झाली आहे. यामुळे सरासरी प्रत्येक भाजीचे होलसेल मधील दर 20 ते 30 रूपये किलो तर किरकोळ मार्केट मधील दर 40 ते 60 रूपये किलोवर आले आहेत . दुसरीकडे कांद्याचे दर मात्र म्हणावे तसे खाली आलेले नाहीत. कांदा 70 ते 80 रूपये किलोने विकला जात आहे. महाराष्ट्रामधील नाशिक, नगर, सांगली, कोल्हापूरमधून भाजीपाला आवक येण्यास सुरवात झाली आहे. परराज्यातील कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरातमधून काही भाज्या येत असल्याने आवकीत वाढ झाली आहे. 500 गाड्यांची असलेली आवक गेल्या चार दिवसापासून 600 च्या वर पोहचली आहे.
भाजीपाला आवक वाढल्याने किरकोळ मार्केट मधील दर कमी झाले असल्याने सर्वसामान्यांना थोडा फार दिलासा मिळाला आहे. 15 दिवसांपूर्वी 100 रुपयाच्यावर पोहचलेले किरकोळ मार्केट मधील भाजीपाला दर आता 60 वर आले आहेत.
प्रती किलो दर -
घाऊक दर किरकोळ मार्केट
टोमॅटो 26 60
कारले 18 40
वांगी 25 40
फ्लॉवर 10 45
फरसबी 25 40
कोबी 14 50
मटार 80 100
पालेभाज्या ( जुडी)
कोथिंबीर 5-8 15-20
पालक 6-10 15-20
मेथी 10-15 20-25