नवी मुंबई : राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या मुसळधार पावसाचा फटका भाजीपाला उत्पादनावर बसला आहे. भाजीपाला दरात तब्बल 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. येत्या काही दिवसात यात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पावसामुळे घाऊक बाजारात भाजीपाल्याचे दर 30 टक्क्यांनी वाढले आहेत. तर किरकोळ बाजारात भाजीपाल्याच्या किंमती 80 ते 120 रुपयांच्या घरात आहेत. राज्यभरात पावसाचे प्रमाण कमी न झाल्यास येत्या काळात परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची शक्यता आहे. पावसामुळे भाज्यांचा पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यामध्येही चिंतेचे वातावरण आहे. मुसळधार पावसामुळे भाजीपाला आवकीवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून 400 ते 500 भाजीपाला गाड्यांची आवक झालीय. नेहमी जवळपास 650 गाड्यांची आवक होत असते. एपीएमसी मार्केट भाजीपाल्याचे दर वाटाणा - 55-65 फरसबी – 50-60 गवार –  50-60 दोडका – 40-45 भेंडी – 35-40 वांगी – 30-35 कोबी – 20-25 फ्लॉवर – 30-35 दुधी भोपळा - 20-25 कार्ली – 30-35 गाजर – 20-25 काकडी – 20-25 जुडी- मेथी – 20-25 पालक – 15-20 कोथिंबीर - 15-20 किरकोळ मार्केट भाजीपाल्याचे दर वाटाणा – 100-120 फरसबी – 90-100 गवार – 70-80 दोडका – 60-70 भेंडी – 50-60 वांगी - 55-65 कोबी - 40-50 फ्लॉवर – 40-50 दुधी भोपळा – 40-55 कार्ली – 60-70 गाजर – 40-50 काकडी – 40-50 जुडी - मेथी – 30-40 पालक – 25-35 कोथिंबीर – 25-35