Vasai Virar Latest News : वसई येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घनेनंतर आता प्रशासनावर बोट येत असल्याने प्रशासनाने आपल्याला बळीचा बकरा बनवू नये म्हणून, रातोरात राजीवली, वाघराळ पाडा येथील चाळ माफियांनी आपला गाषा गुंडाळण्यास सुरुवात केली आहे. वसईच्या स्टेशन जवळ 50 ते 60 कार्यालय थाटलेल्या चाळ बिल्डरांनी दुकानासमोरील नामफलकाच्या पाट्या काढून, कार्यालय बंद ठेवली आहेत. वसईच्या राजवली आणि वाघराळ पाडा येथे भूमाफियांनी डोंगर पोखरुन चाळी वसवल्या आहेत. त्यामुळेच 13 जुलैला दरड कोसळून दोन जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
'टांगा पलटी घोडे फरार' अशी म्हण आपल्याकडे आहे. याचीच प्रचिती वसईतील चाळ बिल्डरांची आली आहे. 13 जुलै रोजी दरड कोसळून दोन जण मृत्यूमुखी झाल्यानंतर प्रशानाने आता आपल्या अंगावर जास्त येऊ नये म्हणून, चाळीवर तसेच चाळ माफियांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्याचमुळे वसई पूर्वेकडील स्टेशनजवळ असलेली राजीवली वाघराळ पाडा येथील चाळ बिल्डरांची कार्यालये रातो रात बंद करुन, कार्यालयासमोरील नामफलकाच्या पाटया ही काढून टाकल्या आहेत.
प्लॅनप्लेट छापून त्याच्यावर अनेक आश्वासनाची खैरात छापून, सामान्य गोरगरीब जनतेची फसवणूक करुन, रुम विकायचे, नगरपालिकेचे पाणी, रस्ता, लाईट अशी आशवासान देवून, बॅकेसारखे इन्स्टॉलमेंट स्किम ही द्यायचे. अशी पञके छापून सामान्य नागरीकांची फसवणूक चाळ माफिया करत असल्याची लेखी तक्रार सनेच्या माजी नगरसेविकेने 2017-18 ला केली होती. माञ प्रशासनाने आजपर्यंत यावर लक्ष दिलचं नाही. जेव्हा दोन निष्पापाचे जीव गेल्यावर सर्व प्रशासकीय यंञणा जाग्या झाल्या आहेत.
यांच्यावर कारवाई कधी?
मुसळधार पाऊस कोसळत असतानाच 13 जुलैची ती पहाट सिंग पिता पुत्रीसाठी जीवघेणी ठरली. दरड कोसळून चार जण गाडले गेले, त्यातील दोघे वाचले तर दोन निष्पापांचा जीव गेला. येथील सर्वे क्रमांक 145 येथे दरड कोसळली होती. मात्र अशीच अवस्था त्याच्या बाजूच्या 146,148 या भागातही आहे. भूमाफियांनी येथे अवैद्य उत्खनन करत, डोंगर भूईसफाट करुन, रातोरात चाळी उभं करत आहेत. सात महिन्यापूर्वी मनसेने सर्वे नंबर 146 च्या 3 डोंगरावर होणाऱ्या अवैध उत्खननचा भांडाफोड केला. त्यावेळी महसूल प्रशासनाला 45 हजार 74 ब्रास बेकायदेशीर मातीचे उत्खनन करुन, त्याची रॉयल्टी शासनाला भरली नसल्याच आढळून आलं होतं. त्यावेळी तहसिलदारांनी 25 कोटी 44 लाख 42 हजार 730 रुपयाचा दंडही ठोठवला होता. हा दंड भरण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती. माञ सात महिने उलटूनही दंड भरला नाही.