ED Summoned to Varsha Raut in Patra Chawl Case : शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. एकीकडे गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान पीएमएलए न्यायालयानं संजय राऊतांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी (ED) कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे ईडीनं राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. त्यामुळे संजय राऊतांपाठोपाठ आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl Case) चौकशी होणार आहे. 6 ऑगस्ट म्हणजेच, आज वर्षा राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 


गुरुवारी (4 ऑगस्ट) झालेल्या सुनावणीत संजय राऊत त्यांच्या खात्यावरुन झालेल्या व्यवहारांबाबत माहिती देत नसल्याचा आरोप ईडीनं कोर्टात केला होता. ज्यांच्याशी व्यवहार झालाय त्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याचंही ईडीनं यावेळी पीएमएलए कोर्टात युक्तीवादा दरम्यान सांगितलं होतं. ईडीची कारवाई राजकीय हेतून केली गेली, असा युक्तिवाद राऊतांच्या वकिलांनी केला होता. तर दुसरीकडे संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स बजावलं आहे. 


पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स बजावलं आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी केली होती. आता पुन्हा एकदा ईडीनं वर्षा राऊत यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.  


पाहा व्हिडीओ : Sanjay Raut and ED : काय आहे पत्राचाळ, वाधवान प्रकरण? | मधली ओळ



संजय राऊत यांच्यावर ईडीने कोणते आरोप केले?


शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याशी थेट संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती ते प्रविण राऊत हे नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Patra Chawl Land Scam: काय आहे पत्राचाळ घोटाळा?