मुंबई : ‘वंटास’ चित्रपटातून झालेल्या नुकसानीमुळे चित्रपटाचा निर्माता अमोल लवटे याने सोने व्यापाऱ्याचं 9 किलो सोनं घेऊन देशाबाहेर पळ काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र, तो फरार होण्याआधीच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अमोलला बेड्या ठोकल्या.
काळबादेवी परिसरात अमोल हा भागीदारीतून सोनं गाळण्याचा व्यवसाय करतो. त्याला 21 जुलैला एका व्यापाऱ्यानं सोनं गाळण्यासाठी दिलं. मात्र, ते सोनं गाळण्याऐवजी सोनं घेऊनच पळण्याचा प्लॅन केला. त्यावेळी व्यापाऱ्यानं त्याच्या नोकराला पाठवलं. मात्र, त्याला झोप लागल्यानं संधीचा फायदा घेत अमोल लवटे ते सोनं घेऊन साथीदारांसह फरार झाला.
संदीप लवटे,आप्पा घेरडे आणि पोपट आटपाडकर असे अमोल लवटेच्या इतर साथीदारांची नावं आहेत.
त्यानंतर व्यापाऱ्याने अमोल लवटेविरोधात गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी सापळा रचून मानखुर्द टी जंक्शन येथून अमोलला अटक केली आहे.