शहापूर : शहापूर तालुक्यातील खर्डी येथे चायनीज सेंटरमध्ये आज सायंकाळच्या सुमारास चायनीजचे काही पदार्थ खाल्ल्याने 9 जणांना विषबाधा झाली. या घटनेत रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
बाजारपेठेतील चायनीज सेंटरमध्ये बसून 9 जणांनी चायनीजचे पदार्थ खाल्ल्याने त्यांना काही वेळातच मळमळ सुरु होऊन उलट्या झाल्या होत्या. विषबाधा झाल्याचे कळताच आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत, या सर्वांना खर्डीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. मात्र येथील आरोग्य केंद्रात अधिक उपचार न मिळू शकल्याने बाधित रुग्णांवर शहापूरमधील उपजिल्हा रुग्णालयात नेऊन उपचार सुरु केले आहेत.
नऊपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती शासकीय रुग्णालयातील डॉक्टरने दिली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार पांडुरंग बरोरा यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची चौकशी केली आणि शहापूर पोलिसांना संबंधित चायनिज चालवणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घटनेचा तपास सुरु केला आहे.
चायनीज खाल्ल्याने 9 जणांना विषबाधा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Aug 2018 08:49 AM (IST)
शहापूर तालुक्यातील खर्डी येथे चायनीज सेंटरमध्ये आज सायंकाळच्या सुमारास चायनीजचे काही पदार्थ खाल्ल्याने 9 जणांना विष बाधा झाली. या घटनेत रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -