मुंबई : मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला करणाऱ्या वैजनाथ पाटीलची जामीनावर सुटका झाली आहे. मराठा आरक्षणाच्या याचिकेला विरोध केल्याबद्दल वैजनाथनं सदावर्ते यांच्यावर हल्ला केला होता.


मुंबई किला कोर्टानं 15 हजारांच्या जामीनावर वैजनाथची सुटका केली आहे. वैजनाथ विरोधात आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.


गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवरील सुनावणीच्या कामाकाजाबद्दल मीडियाला माहिती सांगत होते. ते आटोपल्यानंतर सदावर्ते परतण्यासाठी निघाले असता, एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत, वैजनाथ पाटीलने त्यांच्यावर हल्ला केला होता.


बेसावध असलेल्या सदावर्तेंना बचावासाठी वेळच मिळाला नाही. त्याने सदावर्तेंच्या चेहऱ्यावर बुक्के मारले. यात सदावर्तेंचा चष्माही खाली पडला. गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका का केली, असा प्रश्न विचारत त्याने शिवीगाळही केली होती.


सदावर्तेंवर हल्ला करणारा वैजनाथ पाटील कोण आहे?

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारा वैजनाथ मुकणे पाटील हा जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मुरमा गावचा रहिवाशी आहे. गेल्या चार महिन्यापासून तो पुण्याला नोकरीच्या शोधात गेला होता. आई-वडील गावाकडे शेती करतात. त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे.

हल्ला झाला तो क्षण