Mumbai Weather News : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठं उन्हाचा कहर पाहायला मिळत आहे, तर कुठं अवकाळी पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी वादळी पावसामुळं शेती पिकांच नुकसान झालं आहे. तर कुठं अपघाताच्या घटना देखील घडल्या आहे. मागील दोन दिवसापूर्वी मुंबईत झालेल्या वादळी वाऱ्यामुळं मोठं नुकसान झालं होतं. तर घाटकोपर दुर्घटनेत 14  जणांचा मृत्यू झाला आहे.  दरम्यान, आज मुंबईत नेमकं कसं हवामान राहणार? याबाबत हवामान विभागानं माहिती दिली आहे. 


मुंबईत काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, अवकाळी पावसानंतर आता मुंबईतील काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोबतच, दुपारनंतर मुंबईत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


या भागात आज अवकाळी पावसाचा इशारा


दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. गेल्या अनेक काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यांसह तर काही ठिकाणी गारपीट देखील होत आहे. दरम्यान  येत्या 24 तासात राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्याता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्याचबरोबर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तसेच जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.


अवकाळी पावसाचा फटका शेती पिकांना


दरम्यान, सध्या राज्याच्या विविध भागात सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा फटका शेती पिकांना देखील बसत आहे. अनेक ठिकाणी फळबागांसह भाजीपाला पिकांचं नुकसान झालं आहे. हाती आलेली पिकं या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं जमिनदोस्त झाली आहेत. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, आणखी 19 मे पर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या सुरु असलेल्या वादळी पावसामुळं शहरी भागात देखील मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये काही जणांना जीव देखील गमवावा लागला आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळं वाहतुकीवर देखील परिणाम झाल्या. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.


महत्वाच्या बातम्या:


राज्यात उष्णतेची लाट येणार, रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद होणार, हवामानाचा नेमका अंदाज काय?