मुंबई : मुंबईसह राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांचे शिक्षक बेमुदत संपावर गेले आहेत. राज्यभरातील 3500 कायम विनाअनुदानित शाळेतील सुमारे 40 हजार शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी शाळाबंद आंदोलन केलं आहे. महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे हा निर्णय घेण्यात आला.
सर्व घोषित, अघोषित मराठी तसेच प्रादेशिक भाषेतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित नियमानुसार 100% अनुदान देण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे. तसेच निधी मंजुरीची घोषणा शासन करत नाही, तोपर्यंत राज्यातील कोणत्याही विनाअनुदानित शाळा सुरु करायच्या नाहीत, असा निर्धार शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
शाळांना मिळणारं अनुदान आणि अपुरा निधीविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. मुंबईसह औरंगाबाद, पुणे, परभणी, हिंगोली, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, सातारा सांगली असं राज्यातील सर्वच विभागातील शिक्षक आंदोलनात उतरले आहेत.
शाळाबंद आंदोलनादरम्यान दहावीचे आणि स्कॉलरशिपचे ज्यादा तासही बंद करण्यात आले आहेत. मात्र आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होईल ते सुट्टीच्या दिवशी ज्यादा तास घेऊन भरुन काढू, असं शिक्षकांचं म्हणणं आहे.
राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांचे शिक्षक बेमुदत संपावर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Nov 2018 11:48 PM (IST)
मुंबईसह औरंगाबाद, पुणे, परभणी, हिंगोली, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, सातारा सांगली असं राज्यातील सर्वच विभागातील शिक्षक आंदोलनात उतरले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -