उमर साद हा वॉर्ड नंबर 208 भायखळा इथून लढणार आहे. हा वॉर्ड एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांच्या मतदारसंघात येतो.
मुंबईसाठी MIM ची पहिली यादी
उमर साद हा एमआयएमचा कार्यकर्ता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं सामाजिक काम आहे. केवळ क्रिकेट युसूफ पठाणचा मेव्हणा म्हणून नव्हे, तर त्यांच्या कामामुळेच त्यांना तिकीट देत आहोत, असं वारिस पठाण यांनी सांगितलं.
18 जणांची पहिली यादी
एमआयएम यंदा पहिल्यांदाच मुंबई महापालिकेची निवडणूक लढवत आहे. पहिल्या यादीत मुंबईच्या मुस्लिमबहुल भागातील उमेदवार आहेत.
18 जणांमध्ये 8 महिला उमेदवार आहेत. यामध्ये 6 मुस्लिम तर 2 मुस्लिमेत्तर उमेदवार आहे. एमआयएमने पुष्पा बलराज यांना वॉर्ड क्रमांक 188 मधून, तर सुजाता भालेराव यांना वॉर्ड क्रमांक 189 – सायन- धारावीमधून उमेदवारी दिली आहे.
पहिल्या यादीतील 18 जागांमध्ये दिंडोशी, चारकोप, अंधेरी, वांद्रे, गोवंडी, चांदिवली, भायखळा, मुंबादेवी, मालाड मालवणी, सायन, धारावी या वॉर्डचा समावेश आहे.
संबंधित बातमी