मुंबईसाठी MIM ची पहिली यादी
एबीपी माझा वेब टीम | 24 Jan 2017 02:54 PM (IST)
NEXT PREV
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने पहिली यादी जाहीर केली. या यादीत 18 जणांचा समावेश आहे. एमआयएम यंदा पहिल्यांदाच मुंबई महापालिकेची निवडणूक लढवत आहे. पहिल्या यादीत मुंबईच्या मुस्लिमबहुल भागातील उमेदवार आहेत. 18 जणांमध्ये 8 महिला उमेदवार आहेत. यामध्ये 6 मुस्लिम तर 2 मुस्लिमेत्तर उमेदवार आहे. एमआयएमने पुष्पा बलराज यांना वॉर्ड क्रमांक 188 मधून, तर सुजाता भालेराव यांना वॉर्ड क्रमांक 189 - सायन- धारावीमधून उमेदवारी दिली आहे. पहिल्या यादीतील 18 जागांमध्ये दिंडोशी, चारकोप, अंधेरी, वांद्रे, गोवंडी, चांदिवली, भायखळा, मुंबादेवी, मालाड मालवणी, सायन, धारावी या वॉर्डचा समावेश आहे. एमआयएम 50 जागा लढवणार आहे. येत्या दोन दिवसात दुसरी यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती, आमदार वारिस पठाण यांनी दिली. दरम्यान, एमआयएमच्या प्रचारासाठी खासदार असदुद्दीन ओवेसी आणि आमदार अकबरुद्दीन ओवेसी हे मुंबईत येणार आहेत.