उल्हासनगर : उल्हासनगरमधील ज्ञानेश्वरनगरमधल्या असुरक्षित स्वॅब स्टिकच्या पॅकिंग प्रकरणी मनीष केशवानी नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीष केशवानीने या स्वॅब स्टिक पॅकिंगसाठी इथल्या नागरिकांना दिल्याचं उघड झालं आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून त्याच्या अटकेनंतर या स्टिक कुठून आणल्या हे स्पष्ट होणार आहे.

Continues below advertisement


कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी कोरोनाची अँटिजेन किंवा RTPCR टेस्ट केली जाते. यासाठी टेस्ट वापरल्या जाणाऱ्या टेस्ट किटमध्ये एक स्वॅब स्टिक असते. कोरोना तपासणीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केलेले किटच वापरले जातात. टेस्टिंगसाठी लागणारा स्वॅब रुग्णाच्या स्वॅबमधून स्टिकद्वारे काढला जातो. परंतु या स्वॅब स्टिक उल्हासनगरमधील छोट्याछोट्या घरांमध्ये जमिनीवर सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता पॅकिंग केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. स्वॅब स्टिक पॅकिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच महापालिका प्रशासनासह पोलिसांनी तातडीने धाड टाकली. 


कोरोना RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग, उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकार


या प्रकरणी उल्हासनगर महापालिकेने एफडीएला अहवाल सादर केला होता तर उल्हासनगर पोलीस ठाण्यात मनीष केशवानी या इसमाविरोधात गुन्हा दाखल केला. 


दरम्यान काही महिलांसह लहान मुलं देखील ही पॅकिंग करत होते. स्वॅब किट पॅकिंग करताना ना कोणी मास्क घातलं होतं किंवा ना कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेची काळजी घेतली जात होती. त्यामुळे कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणरे किट कितपत सुरक्षित आहेत, असं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.