अंगावर आलं तर सोडणार नाही, बारमालकांना पोलिसांचा दम
एबीपी माझा वेब टीम | 25 Apr 2017 08:38 PM (IST)
उल्हासनगर : 'अभी माहोल खराब है, जब हमारी जान के उपर आता है तो हम किसीको छोडेंगे नही' हे वक्तव्य उल्हासनगरचे एसीपी अर्थात सहाय्यक पोलीस आयुक्तांनी केलं आहे. विशेष म्हणजे एसीपींनी हा दम भरला आहे एका बारमालकाला. उल्हानगरमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरु असणारे डान्सबार 'माझा'नं उघडकीस आणल्यानंतर कारवाईऐवजी पोलिसांनी जणू पाहणी दौराच सुरु केला आहे. त्यामुळे 'तुमच्या अंगावर येणार तेव्हाच तुमचे तुमचे हात कारवाईसाठी धजावणार का?' असा प्रश्न एसीपींच्या बाबतीत उपस्थित होत आहे. उल्हासनगरमधील डब्लूडब्लूएफ बार. तिथे उभ्या असलेल्या तरुणी या महिला वेटर असल्याचं बारमालक सांगतो. मात्र बारमध्ये महिला वेटरनी पूर्ण कपडे घालावेत, ग्राहकांपासून ठराविक अंतरावर उभं राहावं, असे काही नियम आहेत. हे मात्र पायदळी तुडवले जातात. बारची पाहणी करताना पोलिसांसोबत चक्क शहराचे एसीपी आणि महापालिकेचे उपायुक्त देखील हजर आहेत. मात्र कारवाई शून्य.