एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/04/2017


1. हुंड्याविरोधात हुंकार, औरंगाबादमध्ये एबीपी माझाची हुंडाविरोधी परिषद, आज रात्री 9 वा 'माझा'वर, #हुंडाबंदी सह तुमचं मत ट्विट करुन @abpmajhatv ला टॅग करा https://www.youtube.com/playlist?list=PLh0Ol8Y0tIRRcdPqMiJwASFJkHvShtj9N

2. 22 एप्रिलपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करणार, राज्य सरकारचा निर्णय, कालचीच माहिती मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा सादर, नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांची हुरहूर कायम https://goo.gl/5g0QSi

3. रांगेतील सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करु, मुख्यमंत्र्यांचं शिवसेना मंत्र्यांना आश्वासन https://goo.gl/75EeCH तर तूर खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी आमदार बच्चू कडूंचा आयुक्त कार्यालयात ठिय्या https://goo.gl/MSNtRq

4. तूर पेरायला लावून फसवणूक केल्याचा अन्नदाता संघटनेचा आरोप, मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पैठण पोलिसात अर्ज, पणन आणि महसूलमंत्र्यांचंही नाव https://goo.gl/iwDCni

5. मालेगाव स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंहला जामीन मंजूर, सबळ पुराव्याअभावी 5 लाखांच्या हमीवर जामीन, मात्र कर्नल पुरोहितांचा जामीन नामंजूर https://goo.gl/gK6EZs

6. बनावट पासपोर्ट प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला सात वर्षांचा तुरुंगवास, दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय https://goo.gl/VAl3v5

7. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या 25 जवानांना अखेरची सलामी, जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचं आश्वासन https://goo.gl/DSvLNS

8. नक्षलवाद्यांना निधड्या छातीने प्रत्युत्तर, 5 नक्षलींचा खात्मा करणारे जवान शेर मोहम्मद जखमी, मोहम्मद यांच्या प्रकृती सुधारणेसाठी देशभरातून प्रार्थना https://goo.gl/01UOyZ

9. मोहन भागवतांसारखा कणखर आणि खंबीर राष्ट्रपती असावा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार https://goo.gl/g0HiiE

10. विरोधी पक्षाचा पुन्हा एल्गार, कोल्हापुरात शाहू महाराजांना अभिवादन करुन संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात http://abpmajha.abplive.in/

11. पुण्यात शेतकरी कुटुंबावर सशस्त्र दरोडा, दरोडेखोरांच्या हल्ल्यात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू https://goo.gl/EgPYId

12. रायगडावर 32 मण सोन्याचं सिंहासन बसवणार, शिवप्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजींचा संकल्प https://goo.gl/yvMZJo

13. नागपुरात माजी रणजीपटू अमोल जिचकार यांची गळफास घेऊन आत्महत्या, आर्थिक विवंचनेतून आत्महत्येचा पोलिसांचा अंदाज, मात्र आर्थिक कारण नसल्याचा कुटुंबियांचा दावा https://goo.gl/FbE1HM

14. 'बाहुबली 2' च्या अॅडव्हान्स बुकिंगसाठी चाहत्यांच्या उड्या, पहिला विकेंड बहुतेक ठिकाणी हाऊसफुल्ल, पेटीएमसारख्या वॉलेटकडून तिकीट बुकिंगवर रिफंडची ऑफर https://goo.gl/khhHgQ

15. iPhone 7 वर 20,000 रुपयांची बंपर सूट, फ्लिपकार्टवर 24 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान ‘अॅपल डेज सेल’चं आयोजन https://goo.gl/KTBt3W

राज्यातल्या धगधगत्या प्रश्नाला फुटणार वाचा, एबीपी माझाची हुंडाविरोधी परिषद औरंगाबादेतून पाहा आज रात्री 9. वा @abpmajhatv वर #हुंडाबंदी

सहभाग - अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, आमदार निलम गोऱ्हे, डॉ. अर्चनाताई चाकूरकर, सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा, डॉ. वृषाली किन्हाळकर, मा. न्यायमूर्ती बी जी कोळसे-पाटील, कवी दासू वैद्य, आशा भिसे

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर- https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर