Ujjwal Nikam on Rahul Narwekar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचाच (Ajit Pawar) शिवाय शरद पवार (Sharad Pawar)आणि अजित पवार दोन्ही गटातील आमदार पात्रच आहेत, असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलाय. यावर ज्येष्ठ वकिल उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाकडून मोठी चूक झाली असल्याचे उज्जव निकम म्हणाले आहेत. ते 'एबीपी माझी'शी बोलत होते. 


काय म्हणाले उज्ज्वल निकम? 


आज सर्व निर्णय निवडणूक आयोगाच्या निकालाच्या आधारे देण्यात आले आहेत. मात्र, निवडणूक आयोगाकडून एक मोठी चूक झालेली आहे. निवडणूक आयोगाने पक्षाच्या उद्दिष्टाबाबत कोणीही पुरावा दिला नाही, असे म्हटले. त्यामुळे पक्षाच्या उद्दिष्टांचा भंग झालाय असे आम्ही मानत नाही. पण राष्ट्रवादीच्या घटनेबाबत आयोग म्हणतो की, दोन्ही गटांनी त्याचा भंग केलाय. त्यामुळे हे सर्व चमत्कारिक आहे. पक्षाच्या घटनेनुसार पक्ष संघटनेत कोणाचे प्राबल्य आहे? हा महत्वाचा आणि कळीचा मुद्दा असतो. दुसरा मुद्दा निडवणूक चिन्हावर कोणाची मेजॉरीटी निवडून आली. लोकशाहीमध्ये पक्षीय बलाबल एवढाच मुद्दा ठरत नाही. त्यावरती पक्षाची घटनाही महत्वाची असते. पक्षातील पदाधिकारी लोकशाही पद्धतीने निवडून आले आहेत का? हे निवडणूक आयोगाने पाहाणे क्रमप्राप्त होते. ते पाहण्यात आलेले नाही. परंतू हा आज निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. याला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती नाही. त्यामुळे अध्यक्षांचे काम सोपे झाले. 


'विधानसभा अध्यक्षांनी सुवर्णमध्ये काढलेला आहे, सब खूश रहो'


निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला होता, ते विचारात घेऊन विधानसभा अध्यक्षांनी आजचा निर्णय घेतलाय. 10 व्या परिशिष्टाचा वापर पक्षांतर्गत मतभेद असतील करु नये, अशी मल्लीनाथी राहुल नार्वेकर यांनी केली आहे. घटनेच्या 10 व्या परिशिष्ट्यानुसार आमदार पात्र होतो की, अपात्र ठरतो? या संदर्भात स्पष्ट निर्णय अपेक्षित होता. परंतू  तो काय तसा झाले नाही. विधानसभा अध्यक्षांनी सुवर्णमध्य काढलेला आहे. सब खूश रहो. यापूर्वी शिवसेनेच्या बाबतीतही त्यांनी असाच निकाल दिला होता. तीच री त्यांनी यावेळी ओढली आहे. त्यामुळेच त्यांनी कोणालाही अपात्र केलेलं नाही. अपात्र न केल्यामुळे काही गट दुखावले असतील. काही गट आनंदी असतील, अशी परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळते. परंतू मुख्यत: जो मुद्दा आहे. 6 फेब्रुवारी 2024 ला जो निर्णय दिलेला आहे. त्यामुळे दोन्ही गटांनी पक्षाच्या घटनेची पायमल्ली केली. 


हेही वाचलंत का?


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचाच, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा शब्द आणि शब्द जसाच्या तसा