उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, भाजपचे मंत्री सुभाष देशमुख म्हणतात, गुंडांना घेणार आणि मग त्यांना सुधरवणार, मग मंत्रालयाला काय गुंडालय म्हणायचं का? असा सवाल विचारत, गुंडांसाठी नवीन मंत्रालय सुरु करुन गुंडा मंत्री असं त्याचं नामकरण करा, असा टोलाही त्यांनी लगावला.
शिवसेनेवर होणाऱ्या घोटाळ्याच्या आरोपांना उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ''#didyouknowच्या माध्यमातून केलेली कामं ठासून सांगतो आहे. नालेसफाई केलेली या नालायकांना दिसणारच नाहीत. रस्त्याखालचे जलभोगदे सुमारे 100 किमीचे बांधले. जे बोलतो ते करून दाखवतो म्हणून मुंबईकर निवडून देतात. केंद्राच्या आर्थिक पाहणी अहवालातही मुंबईतल्या कामांचं कौतुक केलंय. त्याला चुकीचं ठरवून तुम्ही स्वतः मोदींवर टीका करत नाही का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला. तसेच मुख्यमंत्री पदावर बसल्याने आरोप करताना जबाबदारीने करावेत, असा सल्लाही त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांना दिला.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदींनी मनमोहन सिंहांवर टीका करताना, मनमोहन सिंह रेनकोट घालून अंघोळ करतात, असं म्हंटलं होतं. यावर राहुल गांधी म्हणाले की, त्यांना बाथरूममध्ये डोकावून पाहण्याची सवय आहे. पण माझ्या बाथरूममध्ये कधी डोकावून पाहायला नाही आले, अशी हिम्मतही ते कधी करणार नाहीत, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील इतरही मुद्दे
- पश्चिम उपनगरात सभेला यायचं म्हंटलं कि, वेळे आधी निघायचं म्हणजे कधी निघायचं हेच कळत नाही. किती ही लवकर निघालो तरी वाहतुककोंडीमुळे उशीर होतोच.
- कोस्टल रोडला केंद्राने परवानगी दिली असती तर हे होणार नाही
- या मुंबईचा मला अभिमान आहे, मुख्यमंत्र्यांना नसेल अभिमान. त्यांना मुंबईशी काही देणं नाही, फक्त घेणं आहे
- मुंबई पटण्यासारखी झाली म्हणे, काही पटण्यासारखं तरी बोला
- आम्ही केलेल्या कामांवर जळफळाट करू नका.
- ठाण्यात उत्स्फूर्त पणे गाजर वाटली कारण हे गाजरच वाटत सुटलेत
- वीज निर्मिती केंद्राची परवानगी 6 महिन्यांपूर्वी देऊ असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं
- पारदर्शकतेने सांगा आजपर्यंत ही फाईलला हल्ली नाही
- हिम्मत असेल तर मुंबई महापालिकेप्रमाणे केंद्रात आणि राज्यात ही पारदर्शकता आणा
- केवळ मुंबई हिसकावून घ्यायची म्हणून आमच्यावर चिखलफेक करता?
- आत रात्री थोडी सोंगं फार अनेक जण येतील मतं फोडण्याचा प्रयत्न करतील
- मीच मुंबईकर हे आम्हाला सांगायचा गरज लागत नाही.
- मुंबईकर आम्हाला चांगला ओळखून आहे आणि तुम्हाला ही ओळखून आहे.
- मुंबईची मेट्रो तुम्ही नाही केली, काँग्रेसने केलंय. मुंबईचा सागरी मार्ग तुम्ही माही शिवसेना करणार.
- मी आणि आदित्य तुमच्या समोर उभा आहे. घराणेशाही म्हणा किंवा परंपरा म्हणा हवं तर.
- आमच्या चार पिढ्या मुंबईच्या सेवेसाठी राबल्या आणि कोणी ही ऐरागैरा येईल त्याला फसू नका