मुंबई: मुंबईच्या बीकेसीतल्या शेवटच्या सभेतही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपवर टीका करताना, ''तुम्ही औकात दाखवू असं म्हणालात. आमचे कपडे उतरवू, 23 तारखेला मुंबईकर तुमचं काय करतात ते बघा,'' असा इशाराही त्यांनी दिला.


याशिवाय पुण्यातल्या सभेवरुनही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला. आज पुण्यातली मुख्यमंत्र्यांची पहिली पारदर्शी सभा होती, असं ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या थापांना कंटाळल्याने सर्वांनी सभेकडे पाठ फिरवली, असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

आज पुण्यातील मुख्यमंत्र्यांची सभा पाहिली, पारदर्शक सभा होती: उद्धव ठाकरे

आमची लेना किंवा देना बँक नाही, अशी भरगच्च भरलेली ही आमची बँक, तुमच्यासारख्या रिकाम्या खुर्च्या नाही. तुमची नो अॅक्सेस बँक: उद्धव ठाकरे

आमच्यावर हवी ती टीका करा, पण पाटणा म्हणून माझ्या मुंबईची अवहेलना करु नका: उद्धव ठाकरे

आरोग्य शिबीरात मुख्यमंत्र्यांचे डोळे तपासणार: उद्धव ठाकरे

भाजपची ;ती' जाहिरात पाहिली, ही कोणती संस्कृती?: उद्धव ठाकरे

भाजपला आता 'चल हट' म्हणण्याची वेळ आली आहे: उद्धव ठाकरे

मुंबईत जोवर शिवसेना आहे तोवर मुबंई सुरक्षित राहणार: उद्धव ठाकरे

भिवंडीतील म्हात्रेंच्या मारेकरी अद्यापही मोकाट का?: उद्धव ठाकरे

कल्याण-डोंबिवलीला 6500 कोटी देऊ म्हणाले, अजून एकही रुपया दिलेला नाही. :उद्धव ठाकरे

फडणवीस फक्त थापा मारत सुटले आहेत: उद्धव ठाकरे

मुंबई महापालिकेवर एकही रुपयाचं कर्ज नाही, उलट बँकेत ठेवी आहेत त्यावर भाजपचा डोळा: उद्धव ठाकरे

जो तुमच्या विरोधात बोलेल त्याला तुम्ही देशद्रोही ठरवणार: उद्धव ठाकरे

'सामना'ने यांना बेजार केलं आहे. त्यामुळेच बंदीची मागणी, ही आणीबाणी नाही तर काय?: उद्धव ठाकरे

'राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे!' हा टिळकांचा अग्रलेख सापडल्यास उद्या सामनामध्ये छापा: उद्धव ठाकरे

देशात चांगलं बदल व्हावा यासाठी तुम्हाला निवडून दिलं, पण तुम्ही स्वत:च म्हणतात, देश बदल रहा है!: उद्धव ठाकरे

शरद पवारांना पद्मविभूषण देऊ शकतात. मग स्वातंत्र्यवीर सावकरकरांना अद्यापपर्यंत भारतरत्न का नाही?: उद्धव ठाकरे

स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या क्रांतीकारकांचं दालन मुंबईत बनवणार: उद्धव ठाकरे

यांनी चरख्यावरुन गांधीजींना हटवलं आहेच. त्यामुळे मोदीच देशाचे राष्ट्रपिता होते असं जनतेला वाटेल: उद्धव ठाकरे

मोदी स्वत: 10 लाखाचा कोट घालता आणि मनमोहन सिंह यांचं रेनकोट पाहता: उद्धव ठाकरे

मी काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा विरोध करणार आणि सत्यासाठी, चांगल्यासाठी भाजपचाही विरोध करणार: उद्धव ठाकरे

आम्ही सुद्धा मोदी-मोदी करत होतो. पण विधानसभेच्या वेळेला तुम्ही शेवटपर्यंत आम्हाला घोळवत ठेवलं: उद्धव ठाकरे

इतकं वर्ष तुमच्या पाठीशी राहिलो, तुम्ही पाठीत वार करता: उद्धव ठाकरे

मातोश्री, ठाकरे कुटुंबावर आरोप करतात. पण विसरु नका अखंड महाराष्ट्रासाठी माझ्या आजोबांनी लढा दिला होता: उद्धव ठाकरे

शिवसेनेचा अपमान त्यावेळेला मी सहन केला: उद्धव ठाकरे