मुंबई: शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या पुण्यातील रद्द केलेल्या सभेवरुन निशाणा साधला.
“ही तर सुरुवात आहे. अजून पुढे बरंच बघायचं आहे. जशी लाट येते तशी ओसरते हे रिकाम्या खुर्चा बघून त्यांच्या लक्षात आलं असेल”, असं शिवसेना आमदार अनिल परब म्हणाले.
गर्दीच नसल्याने सभाच गुंडाळण्याची नामुष्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज ओढावली. सदाशिव पेठेतील टिळक रोडच्या सभेकडे पुणेकरांनी पाठ फिरवल्याने, मुख्यमंत्र्यांना भाषण न करताच माघारी फिरावं लागलं.
यावरुन शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.
नंदलाल समिती अहवालावरुन आव्हान
मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे की नंदलाल समितीच्या अहवालात जे ताशेरे त्यांच्यावर ओढण्यात आले आहेत, ते खोटे आहेत हे सिद्ध करा. सुप्रीम कोर्टाने क्लीन चिट दिली असेल तर दाखवा, असं, अनिल परब म्हणाले.
देवेंद्र फडणवीस नागपूर मनपाचे महापौर होते, त्यावेळी घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. त्यावरुन फडणवीसांनी नंदलाल समितीच्या अहवालाचा दाखला दिला होता.
संबंधित बातम्या
कोणालाही समर्थन देणार नाही, हे लिहून देतो : शरद पवार
सभेला कोणीच नाही, सभा सोडून मुख्यमंत्री रवाना!
मुख्यमंत्र्यांना 'पुणेरी टोमणे', सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस