मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रतोद यांची वर्षा बंगल्यावरील बैठक संपली असून, या बैठकीत शिवसेना पक्ष प्रतोद आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सव्वा तास विभागनिहाय वन टू वन चर्चा केली. या बैठकीत भाजप आमदारांइतकाच निधी सेना आमदारांनाही देण्याचे निश्चित झाले,असल्याचे सू्त्रांकडून समजते.

 

यावेळी प्रत्येक प्रतोदाने आपल्या विभागातील आमदारांच्या समस्या समजावून सांगितल्या. तसेच या समस्या सोडवण्यातील सर्व अडचणी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी समजून घेतल्या. या बैठकीवेळी शिवसेनेच्या विभाग निहाय आमदारांची सर्व लोकोपयोगी कामेही लेखी स्वरूपात मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.

 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रतोद तीन महिन्यांनंतर पुन्हा रिव्ह्यू बैठक घेणार आहेत.