मुंबई: येत्या 15 दिवसात मेटो 2 ब आणि 4साठी कॅबिनेटची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे यांनी दिली आहे.

 

मेट्रो 2 ब या टप्प्यामध्ये डीएन नगर अंधेरी पश्चिम ते मानखुर्द या मार्गावर मेट्रो धावणार आहे. तर मेट्रो 4मध्ये वडाळा, घाटकोपर ते तीन हात नाका (ठाणे) या मार्गावर मेट्रो धावणार आहे. या दोन्ही मार्गांसाठीचा प्रस्ताव कँबिनेटकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

 

येत्या १५ दिवसांत या प्रस्तावाला मंजूरी मिळू शकेल असे संकेत एमएमआरडीएकडून देण्यात आले आहेत.

 

मंजूरी मिळाल्यानंतर लगेच मेट्रो 2 ब आणि ४ साठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात येईल. मुंबई मेट्रोच्या सर्व मार्गांचं काम हे एमएमआरडीएच्या अंतर्गत दिल्ली रेल मेट्रो कॉर्पोरेशनच्या सहकार्यानं होणार. आहे.