ओव्हरहेड वायरला चिकटल्यानं प्रवाशाचा मृत्यू, हार्बर रेल्वे विस्कळीत
एबीपी माझा वेब टीम | 08 Aug 2016 02:54 PM (IST)
मुंबई: हार्बर मार्गावरील जीटीबी रेल्वे स्थानकाजवळ ओव्हर हेड वायरला चिकटल्यानं हार्बरवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायरला चिकटलेल्या प्रवाश्याचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे. प्रवाशाचा मृतदेह खाली काढण्यात आला असून त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, यामुळे पनवेलच्या दिशेनं जाणारी वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला आहे. गेल्या अर्ध्या तासापासून वाहतूक विस्कळीत झाली असल्यानं प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.