भाजप शिवसेनेवर पारदर्शक नसल्याचा आरोप करतं, पण आरोप करा, मात्र आधी स्वत:कडे बघा अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर पलटवार केला आहे. तसंच नोटाबंदी हे भाजपनं लादलेलं संकट असल्याचाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.
भांडुपमधील नागरिकांसाठी स्पोर्ट कॉम्प्लेक्स आणि मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. तसंच शाळकरी मुला-मुलींसाठी बेस्ट बसचा प्रवास मोफत करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. शिवसेनाप्रमुखांच्या नावाने आरोग्य कवच योजना आणणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
- बंगारू लक्ष्मण एक लाख रुपयांची लाच घेत होते ,इतक्या खालच्या पातळीला तुमचा अध्यक्ष गेला - उद्धव ठाकरे
- पाच वर्षापूर्वी पृथ्वीराज चव्हाण बोलले होते , आता 'ढुंडो ढुंडो रे साजना ' अशी त्यांची अवस्था झाली आहे - उद्धव ठाकरे
- शिवसेनेच्या अंगावर याच, एकदाच काय तो फैसला होऊ द्या - उद्धव ठाकरे
- का 114 जागा देऊ ,मरमर माझा शिवसैनिक मरतो, पाच वर्षे काम करतो ,अंगाला एक डाग लागू देत नाही.. तुमच्या घशात जागा घालायच्या? उद्धव ठाकरे
- ज्या पक्षाचा अध्यक्ष लाच घेताना पकडला गेला त्या पक्षाकडून पारदर्शकता का ऐकून घेऊ.. उद्धव ठाकरे
- नोटाबंदी हे भाजपने लादलेलं संकट - उद्धव ठाकरे
- नोटबंदी फटक्यात लोक बेरोजगार झाले ,कोण देणार नोकरी ,कसं भरून निघणार नुकसान - उद्धव ठाकरे
- पाकिटमार आहात तुम्ही ... उद्धव ठाकरे नोटबंदी वर खरमरीत टीका!
- नोटाबंदीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला - उद्धव ठाकरे
- नोटबंदी वरून उद्धव ठाकरे यांची पुन्हा टीका - अनेकजण रांगेत उभे राहिले गेले ,किती दहशतवादी हल्ले थांबले ,काळा पैशावर रोख नाही - उद्धव ठाकरे
- जन्माला येण्याआधी मुलाचा जीव गेला , तुमचे अच्छे दिन काय चाटायचे आहेत का? उद्धव ठाकरे
- नोटाबंदीमुळे दहशतवादी हल्ले थांबले नाहीत, काळा पैसा थांबला नाही - उद्धव ठाकरे
- कोस्टल रोड आठी केंद्राकडून मंजुरी कधी येणार ,स्वतःच्या बुडाखाली काय दडवून ठेवलं ते दाखवा - उद्धव ठाकरे
- शाळकरी मुला-मुलींसाठी बेस्ट बसचा प्रवास मोफत करणार - उद्धव ठाकरे
- शिवसेनेचा रक्तदानाचा विक्रम कुणीही मोडला नाही - उद्धव ठाकरे
- शिवसेनाप्रमुखांच्या नावाने आरोग्य कवच योजना आणतोय - उद्धव ठाकरे
- मुंबई महापालिकेत सत्ता आल्यानंतर मालमत्ता कर रद्द करणार - उद्धव ठाकरे
- मुंबई महापालिकेचं वीजनिर्मीती केंद्र कुणासाठी अडवलंय, ते मुख्यमंत्र्यांनी सांगावं - उद्धव ठाकरे
- मुंबई महापालिका स्वत:चं वीज निर्मिती केंद्र उभारणार - उद्धव ठाकरे
- कोस्टल रोड आठी केंद्राकडून मंजुरी कधी येणार ,स्वतःच्या बुडाखाली काय दडवून ठेवलं ते दाखवा - उद्धव ठाकरे
- आरोप करा, मात्र, आधी स्वत:कडे बघा - उद्धव ठाकरे
- मध्य वैतरणा धरण सर्वात जलद गतीने बांधलं - उद्धव ठाकरे
- मुंबईकरांना पाणी कमी पडू दिलं नाही - उद्धव ठाकरे
- गेल्या पावसाळ्यात दिल्ली, अहमदाबाद शहरं तुंबली, पण मुंबईत पाणी तुंबलं नाही - उद्धव ठाकरे
- मुंबईशी रक्ताचं नातं - उद्धव ठाकरे
- काही जणांना सांगावं लागतं की आम्ही मुंबईकर - उद्धव ठाकरे
- भाजपने आम्हाला पारदर्शकता शिकवू नये - उद्धव ठाकरे
- आज जे हुतात्मा चौकात गेले होते ते अखंड महाराष्ट्राची शपथ घेतील का? उद्धव ठाकरे यांचा भाजपला सवाल
- संयुक्त महाराष्ट्र अखंड ठेवू, तोडू देणार नाही - उद्धव ठाकरे
- ज्या ज्या वेळी संकटं येतात, त्या त्या वेळी माझे शिवसैनिक धावून जातात - उद्धव ठाकरे
- सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल भांडुपकरांना देणार - उद्धव ठाकरे
- भांडुपमध्ये स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारणार - उद्धव ठाकरे
- महाराष्ट्राचा एक इंच तुकडाही तोडू देणार नाही - उद्धव ठाकरे
- भाजपच्या पारदर्शकतेची मी वाट पाहतोय - उद्धव ठाकरे
- चांगल्या कामाचं श्रेय देणार नाही खुसपट मात्र काढणार - उद्धव ठाकरे