उद्धव ठाकरे यांच्याबरोबर 21 वर्षीय तेजस ठाकरे सुद्धा सध्या मुंबईत शिवसेनेच्या विविध शाखांना भेटी देत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा प्रचार करणार आहेत. उद्धव यांचे थोरले पुत्र आदित्य ठाकरे हे राजकारणात सक्रीय असून ते युवासेनेचे अध्यक्षही आहेत.
दरम्यान तेजस ठाकरे काही महिन्यांपूर्वी खेकड्याच्या काही प्रजाती शोधून काढल्या होत्या. यातील एका प्रजातीला ठाकरे कुटुंबीयांचं नाव देण्यात आलं आहे. ‘गुबेरनॅटोरिआना ठाकरी’ आणि इतर चार प्रजाती तेजसने सावंतवाडीजवळ शोधल्या होत्या.