मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC च्या राज्यसेवा परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. दोन एप्रिल 2017 रोजी 155 पदांसाठी परीक्षा होणार आहे. महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा होईल.


या परीक्षेअंतर्गत सहाय्यक विक्रीकर आयुक्त गट-अ ची एकूण 41 पदे आहेत. यापैकी 9 पदे अनुसूचित जाती, 7 पदे अनुसूचित जमाती, 1 पद  भटक्या जमाती (ब) साठी, 3 पदे इतर मागासवर्ग, 2 पदे विशेष मागास प्रवर्ग अशी राखीव असुन खुल्या प्रवर्गासाठी एकूण 19 पदे आहेत.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी गट-अ ची एकूण 4 पदे आहेत. यापैकी अनुसूचित जाती 1, विमुक्त जाती (अ) साठी 1 तर खुल्या प्रवर्गासाठी 2 पदे आहेत.

अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट-अ यासाठी 1 पद असून ते खुल्या प्रवर्गासाठी आहे.

तहसीलदार गट-अ साठी एकूण 25 पदे आहेत. यापैकी अनुसूचित जाती 3, अनुसूचित जमाती 1, विमुक्त जाती (अ) 1, भटक्या जमाती (ब) साठी 1 (भटक्या जमाती (क)-1)  इतर मागास वर्ग 4, विशेष मागास प्रवर्ग 1, तर खुल्या प्रवर्गासाठी 13 पदे आहेत.

सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट-ब साठी एकूण 3 पदे असून 1 पद विमुक्त जाती (अ) साठी तर 2 पदे खुल्या प्रवर्गासाठी आहेत.

कक्ष अधिकारी गट-ब साठी एकूण 15 पदे आहेत. त्यापैकी अनुसूचित जाती 2, भटक्या जमाती (ब) साठी 1, इतर मागास वर्ग 4 तर खुल्या प्रवर्गासाठी 8 पदे आहेत.

सहाय्यक गट विकास अधिकारी गट-ब साठी एकूण 16 पदे आहेत. त्यापैकी 2 पदे अनुसूचित जाती, 2 पदे अनुसूचित जमाती, 2 पदे विमुक्त जाती (अ) साठी, 2 पदे इतर मागास वर्गासाठी तर इतर 8 पदे खुल्या प्रवर्गासाठी आहेत.

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, गट-ब साठी एकूण 14 पदे आहेत. त्यापैकी 1 पद अनुसूचित जाती, 3 पदे अनुसूचित जमाती, 1 पद  विमुक्त जाती (अ) साठी, 2 पदे इतर मागास वर्गासाठी तर 7 पदे खुल्या प्रवर्गासाठी आहेत.

उप अधिक्षक, भूमी अभिलेख, गट-ब साठी 2 पदे आहेत. ही दोन्ही पदे खुल्या प्रवर्गासाठी आहेत.

उप अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब साठी एकूण 2 पदे आहेत. त्यापैकी 1 पद अनुसूचित जातीसाठी व 1 पद खुल्या प्रवर्गासाठी आहे.

सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब साठी 1 पद असून ते खुल्या प्रवर्गासाठी आहे.

नायब तहसिलदार, गट-ब साठी एकूण 31 पदे असून 3 पदे अनुसूचित जाती, 4 पदे अनुसूचित जमाती, 1 पद विमुक्त जाती (अ) साठी, 1 पद इतर मागास वर्ग, 2 पदे विशेष मागास प्रवर्गासाठी तर 20 पदे खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध आहेत.

उपरोक्त रिक्त जागांसाठी प्रवर्गनिहाय सामाजिक/समांतर आरक्षण उपलब्ध आहे. तसेच नमूद केलेल्या पदसंख्येत व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे.

उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा योजना, अभ्यासक्रम, इत्यादीबाबतच्या सविस्तर तपशीलासाठी आयोगाच्या www.mpsc.gov.in तसेच https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीचे व सविस्तर जाहिरातीचे कृपया अवलोकन करावे.

ऑनलाईन अर्ज https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळाद्वारे दिनांक 14 डिसेंबर, 2016 ते 3 जानेवारी 2017 या कालावधीतच सादर करणे आवश्यक आहे.