मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्माच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पर्यावरणाचं नुकसान केल्याप्रकरणी कपिल शर्माविरोधात मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्सोवामधील ऑफिससाठी खारफुटी नष्ट केल्याचा आरोप कपिल शर्मावर आहे.
सामाजिक कार्यकर्त्या आभा सिंह यांच्या तक्रारीनंतर कपिल शर्माविरुद्ध एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन अॅक्ट आणि एमआरटीपी अंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे.
कपिल शर्माने दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मेंशन करुन मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांनी 5 लाखांची लाच मागितल्याची तक्रार केली होती. परंतु यानंतर कपिलवरच अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप झाला होता. शिवाय कपिलने पर्यावरणाचं नुकसान केल्याचा आरोप महापालिकेने तपासानंतर केला होता.
कपिलने त्या लाचखोराचं नाव सांगितलं नाही, त्यामुळे आयपीसीच्या कलम 184 च्या आधारावर कपिलवरही केस दाखल होऊ शकते. याप्रकरणी 1 ते 6 महिन्यांची शिक्षा होऊ शकते, असं आभा सिंह म्हणाल्या.
फक्त कपिलच नाही तर या अनधिकृत बांधकामामध्ये समावेश असलेल्या सगळ्यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही आभा सिंह यांनी केली आहे.
https://twitter.com/ANI_news/status/808970267636604928