उद्धव ठाकरे 9 जानेवारीला मराठवाडा दौऱ्यावर
एबीपी माझा वेब टीम | 05 Jan 2019 07:59 PM (IST)
उद्धव ठाकरे औरंगाबाद, जालना, बीड, परभणी या दुष्काळग्रस्त भागातील परिस्थितीची पाहणी करणार आहेत. तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे 9 ते 16 जानेवारी दरम्यान संपूर्ण दुष्काळी भागाची पाहणी करणार आहेत.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 9 जानेवारीला मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी या दुष्काळग्रस्त भागातील परिस्थितीची पाहणी उद्धव ठाकरे करणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना मिळालेल्या कर्जमाफीची चौकशी करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची महत्वाची बाब म्हणजे या दौऱ्यावेळी शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत दुष्काळग्रस्तांना 100 ट्रक पशूखाद्य, धान्य, पिण्यासाठी पाण्याचे टँकर या वस्तूचं वाटप शिवसेनेकडून केलं जाणार आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे 9 ते 16 जानेवारी दरम्यान संपूर्ण दुष्काळी भागाची पाहणी करणार आहेत. राज्य सरकारनं 31 ऑक्टोबरला राज्यातल्या 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये 112 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा, तर 39 तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय राज्यातील 69 मंडलातील 900 गावांमध्ये दुष्काळ जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे. 50 पैसे पेक्षा कमी आणेवारी असलेली आणि कमी पर्जन्यमान असलेल्यात गावात दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे. दुष्काळ निवारण आणि मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यात आला आहे. गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झालेले तालुके (112) सांगली (5) : जत, कवठेमहांकाळ, खानापूर-विटा, आटपाडी, तासगांव सातारा (1) : माण-दहीवडी सोलापूर (9) : करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढे, पंढरपूर, सांगोले, अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर पालघर (3) : पालघर, तलासरी, विक्रमगड धुळे (2) : धुळे, सिंदखेडे जळगाव (13) : अमळनेर, भडगांव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, यावल नंदुरबार (3) : नंदुरबार, नवापूर, शहादा नाशिक (4) : बागलान, मालेगांव, नांदगांव, सिन्नर अहमदनगर (11) : कर्जत, अहमदनगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, रहाता, रोहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड औरंगाबाद (9) : औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड,सोयगाव, वैजापूर, कन्नड बीड (11) : आष्टी, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव, शिरुर (कासार), वडवणी, केज, आंबेजोगाई, परळी, पाटोदा, जालना (7) : अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसांगवी, जाफ्राबाद, जालना, परतूर नांदेड (2) : मुखेड, देगलूर उस्मानाबाद (7) : लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर, वाशी, भूम परभणी (6) : मनवथ, पाथरी, सोनपेठ, पालम, परभणी, सेलू हिंगोली (2) : हिंगोली, सेनगाव अमरावती (1) : मोर्शी बुलडाणा (7) : खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा यवतमाळ (6) : बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड, राळेगाव चंद्रपूर (1) : चिमूर नागपूर (2) : काटोल, कळमेश्वर मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झालेले तालुके (39) पुणे (7) - आंबेगाव, पुरंदर, सासवड, वेल्हे, बारामती, दौंड, इंदापूर, शिरुर-घोडनंदी सातारा (2) - कोरेगांव, फलटण धुळे (1) - शिरपूर नंदुरबार (1) - तळोदे नाशिक (4) - देवळा, इगतपुरी, नाशिक, चांदवड नांदेड (1) - उमरी हिंगोली (1) - कळमनुरी लातूर (1) - शिरुर अनंतपाळ अकोला (5) - बाळापूर, बार्शिटाकळी, मुर्तिजापूर, तेल्हारा, अकोला अमरावती (4) - अचलपूर, चिखलदरा, वरुड, अंजनगांव सुर्जी बुलडाणा (1) - मोताळा वाशिम (1) - रिसोड यवतमाळ (3) - केलापूर, मारेगांव, यवतमाळ चंद्रपूर (4) - ब्रम्हपुरी, नागभिर, राजुरा, सिंदेवाही नागपूर (1) - नरखेड वर्धा (2) - आष्टी, कारंजा