मुंबई : रस्ते घोटाळा असो की नाले घोटाळा सगळ्या घोटाळ्याची चौकशी करा, शिवसेनेनं एक रुपाचंही खोटं काम केलं नाही. असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलंय.

 

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीतर्फे गणेशोत्सवादरम्यान जनजागृती कशी करावी याबद्दल कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये उद्धव ठाकरे बोलत होते.यावेळी मुंबई पालिका आयुक्त अजय मेहता,महापौर स्नेहल आंबेकरांची उपस्थिती होती.

 

जिकडे चूक आहे चूक पण त्यातून लगेच घोटाळा झाला. असा अर्थ काढला जातो आहे. रस्ते घोटाळा शिवसेनेनं केला असता, तर महापौरांनी चौकशीचे आदेश दिलेच नसते. या चौकशीतून सत्य बाहेर येईल, असं सांगायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत.