ठाणे: निवडणुकीच्या वेळी काही लोक यूपीतून येतात आणि इथल्या लोकांचे ब्रेन वॉश करतात, निघून जातात, मात्र आम्ही निवडणुकीनंतरही तुमच्यासोबत राहतो. त्यामुळे मराठी आणि यूपीचे लोक हे दूध आणि सारखेसारखे आहेत, पण काही लोक त्यामध्ये मिठाचा खडा टाकत असल्याची टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. मीरा भाईंदरमध्ये यादव समाजसेवा संस्था चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित गोवर्धन पूजा समारोहला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहिले. त्यावेळी ते बोलत होते.


कालपर्यंत जे आपले होते ते आज आपल्या विरोधात आहेत. महाभारतात कृष्णाने सांगितलं की, धर्माच्या विरोधात अधर्म उठतील त्यांचा नाश करावा लागेल. त्या पद्धतीने धर्माच्या विरोधात जाणाऱ्या भाजपला धडा शिकवणं गरजेचं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. 


राम मंदिराचे निर्माण होत असताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यावेळी हिंदूंच्या पाठीशी शिवसेना उभी राहिली होती. निवडणुकीत गावाहून काही नेते येतात, ते तुमचं ब्रेन वॉश करतात, प्रचार संपल्यानंतर ते नेते निघून जातात, मात्र आम्ही निवडणुकीनंतर ही आपल्या सोबत राहतो. मराठी माणूस आणि यूपीचे लोक हे दूध आणि साखरेसारखे आहेत. मात्र काहीजण यात मिठाचे खड्डे टाकत आहेत. 


रामलल्ला ही तुमची खासगी प्रॉपर्टी आहे का?


अयोध्येला राम मंदिराची निर्मिती होतेय ही चांगली बाब आहे. हृदयात राम आणि हाताला काम असं आमचं हिंदुत्व आहे. शिवसैनिक आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांची कामे करतात. मध्य प्रदेशातील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, जिंकून आल्यावर मोफत श्रीरामाचं दर्शन देवू, मात्र सर्वांना मोफत दर्शना साठी घेवून गेलं पाहिजे फक्त मध्य प्रदेशमध्ये भाजपला मतं देणाऱ्या लोकांनाच मोफत रामलल्लाचे दर्शन देणाऱ्या भाजपचे हिंदुत्व हे दुटप्पी आहे. रामलल्ला ही तुमची प्रॉपर्टी आहे का? 


गुजरात सोडून देशात इतरही राज्ये आहेत


उत्तर भारतीय इकडे मुंबई महाराष्ट्रात कामासाठी येतात, पण इथले सगळे उद्योग आता गुजरातला नेण्यात येत आहेत. मग या बांधवांनी काय करायचं? गुजरात मजबूत झाला तर देश मजबूत होईल असं भाजप म्हणतंय, मग महाराष्ट्र मजबूत झाला तर देश मजबूत होणार नाही का? गुजरात सोडून देशात इतरही राज्ये आहेत. 


ही बातमी वाचा: