Continues below advertisement

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती कधी होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. अखेर या युतीला मुहूर्त मिळाला. बुधवारी दुपारी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा होणार आहे. दोन्ही बंधूंमध्ये जागावाटपाची चर्चा जरी झाली असली तरी त्याची घोषणा कधी केली जाणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

जुलै महिन्यातील मराठी विजय मेळावा आणि त्यानंतर वाढलेल्या भेटीगाठींमुळे ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालं होतं. मात्र, ठाकरे बंधू युतीची अधिकृत घोषणा करणार कधी? याची प्रतीक्षा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. अखेर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी युतीचा मुहूर्त जाहीर केला.

Continues below advertisement

बुधवारी दुपारी 12 वाजेच्या मुहूर्तावर या युतीची घोषणा केली जाणार आहे. मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे. मुंबईसह इतरही महापालिकांमध्ये ही युती होणार असल्याचं संजय राऊतांनी जाहीर केलं. तसेच त्याचवेळी जागावाटपाबाबतची सर्व उत्तर मिळतील, असंही राऊत म्हणाले.

Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance : ठाकरे बंधूंची युती कुठे कुठे?

ठाकरे बंधूंच्या आतापर्यंतच्या गाठीभेटी : कधी आणि कुठे?

5 July 2025 मराठी भाषेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर.

27 July 2025 मराठी भाषा मेळाव्यानंतर जवळीक वाढली; राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी दाखल.

27 August 2025 तब्बल दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन सहकुटुंब गणरायाचे दर्शन घेतले.

10 September 2025 उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यासोबत शिवतीर्थ निवासस्थानी दाखल.

5 October 2025 खासदार संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्याला दोन्ही कुटुंबे एकत्र. त्याच दिवशी राज ठाकरे कार्यक्रमानंतर मातोश्रीवर पोहोचले.

12 October 2025 राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर स्नेहभोजनासाठी गेले.

17 October 2025 मनसे दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते; संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र.

22 October 2025 राज ठाकरे यांच्या आईंच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी भेटीसाठी.

23 October 2025 भाऊबीज निमित्त ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र.

13 October 2025 राज्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्यासोबत बैठक.

14 October 2025 राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे आणि राज्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्यासोबत एकत्रित बैठक व त्यानंतर पत्रकार परिषद.

1 November 2025 मतदारयाद्यांतील घोळ आणि निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा; या मोर्चाला “सत्याचा मोर्चा” असे नाव.

10 November 2025 अभिनेता सुबोध भावे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही नेते एकत्र.

27 November 2025 उद्धव ठाकरे अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यासोबत बैठकीला उपस्थित.

10 December 2025 अमित ठाकरे यांच्या मेव्हण्याच्या लग्नाला संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित.

ही बातमी वाचा: