Continues below advertisement

मुंबई : देशातील सर्वात मोठी महापालिका असलेली मुंबई पुन्हा एकदा जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सरसावले असून त्यांचे जागावाटपही पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाकरेंच्या सेनेची आणि मनसेची युती होणार असून त्याची बुधवारी घोषणा करण्यात येणार आहे. उत्तर भारतीय मतदार हा भाजपच्या पाठीशी असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मराठी मतदार हा आपल्याकडे कसा वळला जाईल यासाठी ठाकरे बंधूंना प्रयत्न करावे लागणार आहेत.

दोन्ही ठाकरे बंधू एकत्र जरी आले असले तरी ते महाविकास आघाडीमधून लढतील की नाही याची मात्र अद्याप स्पष्टता नाही. काँग्रेसने या आधीच एकटे लढण्याची घोषणा केली असल्याने दलित आणि मुस्लिम मतांची बेगमी करण्याचं मोठं आव्हान ठाकरे बंधूंसमोर असणार आहे. तसेच मराठी बहुल परिसरातील सर्व मराठी मतं कशी पारड्यात टाकता येतील यासाठीही रणनीती आखावी लागणार आहे.

Continues below advertisement

Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance : ठाकरे बंधूंसमोर कोणती आव्हाने?

ज्या ठिकाणी दोन्ही पक्षाची ताकद आहे आणि ज्या ठिकाणी दोन्ही पक्षांनी दावा केला होता, त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याला, स्थानिक पदाधिकाऱ्याला सोबत ठेवून बंडखोरी रोखण्याचा आव्हान असेल

मराठी बहुल प्रभागात जिथे दोन्ही पक्षाची ताकद आहे तिथे अधिकाधिक मराठी मतदार आपल्याकडे कसे वळतील याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. मराठी मतदार महायुतीतील भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेसोबत मोठ्या प्रमाणावर जाणार नाहीत यासाठीची रणनीती आखावी लागेल.

काँग्रेस पक्षाला सोबत घेण्याचा प्रयत्न आतापर्यंत अयशस्वी झाल्याने काँग्रेस सोबतचा दलित आणि मुस्लिम मतदार आपल्या बाजूने वळवण्यासाठी मोठी रणनीती आखावी लागणार आहे. या मतदारांचा फायदा ठाकरेंच्या शिवसेनेला विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात झाला होता.

दलित आणि मुस्लिम मतदारांची विभागणी काँग्रेस पक्षामुळे मोठ्या प्रमाणात होऊ शकते, त्याचा फटका ठाकरे बंधूंच्या युतीला बसू शकतो. याचा विचारही दोन्ही पक्षांना करावा लागेल. आपला मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुद्धा सन्मानजनक जागा देऊन त्या निवडून आणण्यासाठी चा प्रयत्न करावा लागेल.

महायुतीमध्ये आणि विशेष करून भाजपसोबत असलेल्या उत्तर भारतीय मतदारांची ताकद पाहता उत्तर भारतीय मत आपल्या बाजूने कसे वळतील किंवा जर भाजपने उत्तर भारतीय मत मोठ्या संख्येने वळवले तर मग मराठी मतदार आपल्या बाजूने मोठ्या संख्येने कसा वळेल यासाठीची स्ट्रॅटेजी काय असणार? यावर विशेष लक्ष केंद्रित करावे लागेल.

अनेक मुद्दे महापालिका निवडणुकीसाठी घेऊन जात असताना किंवा एकत्रित वचननामा जाहीर करत असताना दोन्ही पक्षांच्या प्रमुखांमध्ये एकवाक्यता ठेवून निवडणुकीला सामोरे जाणे आणि मतदारांपर्यंत पोहोचणं हे आव्हान असेल.

ही बातमी वाचा: