मुंबई : पुलवामा हल्ल्याबाबत माझी प्रतिक्रिया वेगळी नाहीये. लोकांच्या भावना आहेत त्याच माझ्याही भावना आहेत. आता पाकिस्तानला धडा शिकविण्याची वेळ आहे. आता शांत राहणे मर्दानगी नाही, पाकिस्तानमध्ये घुसून आता मारले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.


पुलवामामधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारकडे पाकिस्तानसंदर्भात कठोर भूमिका घेण्याची मागणी केली.

पाकिस्तानचे काहीतरी केले पाहिजे. एकदाच पाकिस्तानचा सोक्ष मोक्ष लावून टाका, असे त्यांनी म्हटले आहे. हा हल्ला म्हणजे इंटेलिजेंसचे अपयश आहे. जसे दहशतवादी आपल्या भूमीत येऊन हल्ले करत आहेत तसेच आपण देखील त्यांच्या भूमीत जाऊन हल्ला करणे गरजेचे आहे, असे ठाकरे म्हणाले.

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला. आता केंद्र सरकारने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केले पाहिजे, अशी मागणी  ठाकरे यांनी केली आहे. गुप्तचर यंत्रणांनी हल्ल्यापूर्वी इशारा दिला होता, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता उद्धव ठाकरे म्हणाले, इशारे देऊनही हल्ला होतो. मग अधिकारी नेमके काय करत होते, ज्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. नुसत्या घोषणा देऊन किंवा दंड थोपटून काहीही होणार नाही.  पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

संबधित बातम्या


पाकिस्तानविरुद्ध पहिली कारवाई, 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढून घेतला


पाकिस्तानचा 'एमएफएन' दर्जा रद्द, 'मोस्ट फेवर्ड नेशन' म्हणजे काय?


Pulwama terror attack : हल्ल्याला फक्त पाकिस्तान जबाबदार नाही, फारुख अब्दुल्लांचं वादग्रस्त वक्तव्य


Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा!

Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावं

Pulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संताप

भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ, राज ठाकरेंचे मोदींना आवाहन

जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी

शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : माजी लष्करप्रमुखांचा इशारा

पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 40 जवान शहीद