मुंबई: ‘महापौर शिवसेनेचाच होणार, पण दगा फटका होता कामा नये. प्रलोभने-अमिषांना बळी पडू नका.’ अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधला.
‘त्यांच्याकडे केंद्रात आणि राज्यातल्या सत्तेची ताकद होती. शिवसैनिक वडापाव, भाकरी खाऊन रस्त्यावर लढला. हे यश शिवसैनिकांच्या ताकदी शिवाय कधीही शक्य नव्हते. बाळासाहेबांनी दिलेल्या शपथेच्या आणि निष्ठेच्या शिकवणीवर, निखाऱ्यांवर शिवसैनिक वाटचाल करतो आहे.’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
‘11 लाख मतदारांची नावे यादीतून गायब झाली नसती तर, आज चित्र वेगळेच असते. आपल्या अनेक जागा अगदी थोड्या मतांच्या फरकाने गेल्या.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी 11 लाख मतदारांची नावं गायब झाल्याचा मुद्दाही यावेळी पुन्हा एकदा उपस्थित केला.
मुंबईच्या महापौरपदाबद्दल योग्य वेळी भूमिका जाहीर केली जाईल. असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. मुंबई महापालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आल्यानंतर आज शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक शिवसेना भवनात झाली.
या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह शिवसेनेचे नेते आणि नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीत नवीन नगरसेवकांना महापौर मतदानाच्या दिवशी मतदानाची पद्धत कशी असते याची माहिती दिली गेली.
संबंधित बातम्या:
सत्ता मिळो न मिळो मात्र, आम्ही काँग्रेससोबत जाणार नाही: मुख्यमंत्री
शिवसेनेनं महापौरपदासाठी काँग्रेसची मदत मागितली मात्र आमचा नकार: निरुपम
शिवसेना-भाजप युतीसाठी मी पुढाकार घेईन: आठवले
युती होणार का? आशिष शेलार म्हणतात…
राज ठाकरेंच्या ‘सात’ची ‘साथ’ शिवसेनेला की भाजपला?
तिसरा अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, संख्याबळ 87
युतीबाबत अजून विचार केलेला नाही, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण