मुंबई: ‘शिवसेनेनं युतीचा प्रस्ताव दिला तर त्याचा नक्की विचार करेन’, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी सांगितलं आहे.


मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना एकत्र यावे यासाठी मी प्रयत्नशील असल्याचं रामदास आठवले म्हणाले. आज त्यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भाजप-शिवसेना युतीसंदर्भात चर्चा केली. दरम्यान, युतीसाठी उद्धव ठाकरेंशीही चर्चा करणार असल्याचं रामदास आठवलेंनी सांगितलं.

‘युतीबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. पण शिवसेनेकडून अजून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे मुख्यमंत्री सध्या शिवसेनेच्या प्रस्तावाची वाट पाहत आहेत.’ असंही आठवलेंनी स्पष्ट केलं.

‘शिवसेना आणि भाजपनं युती करुन अडीच-अडीच वर्ष महापौरपद घ्यावं अशी माझी इच्छा आहे. तसं मी मुख्यमंत्र्यांना बोललोही आहे.’ असंही आठवलेंनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

शिवसेना-भाजप युतीसाठी मी पुढाकार घेईन: आठवले

युती होणार का? आशिष शेलार म्हणतात…

राज ठाकरेंच्या ‘सात’ची ‘साथ’ शिवसेनेला की भाजपला?

तिसरा अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, संख्याबळ 87

युतीबाबत अजून विचार केलेला नाही, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण