मुंबई : दुष्काळाच्या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. दुष्काळ झपाट्यानं पसरत आहे. त्यामुळे आम्ही कोणत्या विभागात काय कामं करायला पाहिजे यासाठी आढावा घेतला आहे, अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.
"दुष्काळाच्या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक आहे. त्यामुळेच झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करण्यासाठी मी 24 तारखेला पंढरपूरला सभा घेणार आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या विभागात काय कामं करायला पाहिजे यासाठी आढावा घेतला. शिवसेना नेहमीच दुष्काळाच्या मुद्द्यांवर आक्रमक असते. त्यामुळे 'कुंभकर्णा जागा हो' अशी आमची पुढची भूमिका असणार आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना दुष्काळाच्या मुद्द्यावरुन सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या मंत्र्यांना दुष्काळ दौरे करण्याचे आदेश दिले आहेत. दुष्काळ दौऱ्यांमध्ये सेनेच्या मंत्र्यांना मातोश्रीवरुन राज्यातल्या दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत, की नाही, याबाबत शहानिशा करण्याबाबत बजावले आहे.
राम मंदिराच्या मुद्यावर शिवसेना पुन्हा आक्रमक
राम मंदिराच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर तोफ डागली आहे. निवडणुका जवळ आल्या की मंदिर बांधणार अशी घोषणा केली जाते. मात्र मंदिर काही उभं राहत नाही. म्हणून मी राम मंदिराचा मुद्दा हाती घेतल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
"केंद्रात एक मजबूत सरकार सत्तेवर आहे. असं असतानाही राम मंदिराचा मुद्दा अजून रखडलेला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राम मंदिराचा मुद्दा घेत उद्धव ठाकरे 24 आणि 25 नोव्हेंबरला अयोध्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी "राम मंदिर लवकरात लवकर बांधलं गेलं पाहिजे. त्यासाठी अध्यादेश काढा, कायदा बनवा किंवा इतर मार्ग वापरा, पण राम मंदिर बांधा", अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती. "राम मंदिर बांधल नाही तर पुढे मंदिर बनले, पण हे सरकार नाही बनणार", असा इशाराही उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला होता.
संबधित बातम्या
शिवसेना सरकारला कोंडीत पकडणार? मंत्र्यांना दुष्काळ दौऱ्यांचे आदेश
केंद्रीय पथक महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा करणार
जनतेच्या कामासाठी मंदिराची मदत घ्यावी लागली : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांचं चंद्रकांत पाटलांना पाठिंब्याबाबत आश्वासन | मुंबई | एबीपी माझा