मुंबई : फेरीवाले किती मुजोर झाले आहेत, याचं उदाहरण मुंबईत पाहायला मिळालं. पत्नीची छेड काढली म्हणून हटकल्याने फेरीवाल्याच्या टोळक्याने चक्क एका पोलीस उपनिरीक्षकाला जबर मारहाण केली. परळमधील केईएम रुग्णालयासमोर हा प्रकार घडला. या प्रकरणी भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यापैकी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत तर तीन जण पसार झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
रफी अहमद किडवई मार्ग पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या आजारी भावावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याला भेटण्यासाठी पीएसआय पत्नीसोबत 24 नोव्हेंबर रोजी केईएममध्ये जात होते. यावेळी पीएसआय सिव्हिल ड्रेसवर होते. पाण्याची बॉटल घेण्यासाठी दोघेही केईएम रुग्णालयाच्या समोरील दुकानात गेले असता, तिथल्या फेरीवाल्यांनी पत्नीविरोधात अश्लील शेरेबाजी केली. सुरुवातीला दोघांनीही त्याकडे दुर्लक्ष केलं, परंतु फेरीवाल्यांची शेरेबाजी काही थांबत नव्हती.
याबाबत पोलीस उपनिरीक्षकाने एका फेरीवाल्याला जाब विचारुन हटकलं. यामुळे संतापलेल्या इतर फेरीवाल्यांनी पीएसआयला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर टॅक्सीत घालून मारहाण केली. पीएसआयने मदतीसाठी आरडाओरडा केला. एका पादचाऱ्याने याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी ही टॅक्सी पकडली. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. तर चार आरोपींना पळ काढण्यात यश आलं.
पोलीस खात्याच्या उदासिनतेमुळे पीएसआय तणावाखाली
परंतु या प्रकरणात पोलिसांची उदासिनता पुन्हा एकदा समोर आली आहे. संबंधित घटना 24 नोव्हेंबर रोजी घडली. यानंतर चार दिवसांनी म्हणजेच 28 नोव्हेंबरला आरोपींवर लावलेल्या कलमांमध्ये वाढ करण्यात आली. मग आणखी दोन दिवसांनी चार आरोपींना अटक करण्यात आली. "पोलीस उपनिरीक्षक असल्याचं सांगूनही पोलीस स्टेशनमध्ये कोणीही दखल घेत नव्हतं. छेड काढणाऱ्यांना हटकलं म्हणून मारहाण झाली. तरीही स्वत:चं पोलीस खातंच याची नोंद घेत नाही," असं पीएसयआने सांगितल्याचं कळतं. तसंच या सगळ्या प्रकारामुळे पीडित पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्या पत्नी अतिशय तणावाखाली असल्याचं समजतं.
पत्नीविरुद्ध शेरेबाजी करण्यास हटकल्याने फेरीवाल्यांची पीएसआयला मारहाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Dec 2018 02:18 PM (IST)
याबाबत पोलीस उपनिरीक्षकाने एका फेरीवाल्याला जाब विचारुन हटकलं. यामुळे संतापलेल्या इतर फेरीवाल्यांनी पीएसआयला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -