Thackeray Shinde Fadnavis Together in Mumbai : हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) महाराष्ट्रातलं एक मोठं नाव राजकाराणात असून देखील नेहमीच रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत बाळासाहेब दिसले, त्यांनी स्वतः शेकडो आमदार खासदार सभागृहात पाठवले पण स्वतः विधीमंडळाच्या राजकारणात सक्रीय सहभाग घेतला नाही. मात्र राजकारणातल्या उल्लेखनीय कामकाजाचा गौरव म्हणून त्याचं तैलचित्र विधीमंडळात लावण्यात येतं आहे. याच निमित्तानं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एकत्र येण्याची शक्यता आहे.
23 जानेवारीला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्तानं विधिमंडळात लावण्यात येणार आहे. त्यानिमित्तानं उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेसोबत एकाच मंचावर दिसणार अशी चर्चा आहे. बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्षासाठी महत्वाचं आहे, एक बाळासाहेबांचे रक्ताचे वारसदार आहेत तर दुसरीकडे आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असल्याचं सांगत सत्ता स्थापन केलेले एकनाथ शिंदे आहेत. या दोघांसाठी बाळासाहेब ठाकरे हा विषय संवेदनशील झाला आहे. बाळासाहेबाच्या हिदुत्वांचा झेंडा घेत शिंदेंनी वेगळी चूल मांडली पण आता त्याचा बाळासाहेबांच्या तैलचित्रांच्या निमित्तानं दोघेही एकत्र दिसण्याची शक्यता आहे.
यासंदर्भातलं अधिकृत निमंत्रण विधीमंडळाकडून सर्वच पक्षाच्या प्रमुखांना देण्यात येणार आहे त्यामुळे सध्या चर्चा हिच आहे की बाळासाहेबांच्या कार्यक्रमानिमित्तानं उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेसोबत एकत्र दिसणार का?
ज्याच्या राजकारणात परिस्थिती बदलेली आहे. एकेकाळी एकत्र असणारे नेते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आता वेगळे झाले आहेत, गेल्या सहा महिन्यात एकदाही हे दोन्ही नेते एकत्र दिसले नाही, मुख्यमंत्री पदावरून पायउतार केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याबद्दल ठाकरेंच्या मनात प्रचंड नाराजी आहे.
गेल्या काही महिन्यात एकनाथ शिंदे आणि देवेद्र फडणवीसांसोबत अजित पवार आणि शरद पवार मंच शेअर करताना दिसले तर कधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिंदे फडणवीसांसोबत दिसले पण या काळात ना कधी आदित्य ठाकरे ना उद्धव ठाकरे शिंदे फडणवीसासोबत दिसले. तेव्हा सर्वाचं लक्ष उद्धव ठाकरेंकडे लागलं आहे की ते, या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारणार का?
सदर कार्यक्रमात उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेसोबत एकत्र दिसण्याची तशी शक्यता कमी आहे. महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही कितीही वैचारिक मतभेद असले तरी द्वेषाचं राजकारण नव्हतं. पण दुर्देवानं गेल्या काही वर्षापासून द्वेषाचं राजकारण सुरु असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे अभूतपूर्व राजकीय स्थित्यांतरानंतर वैयक्तिक हेवेदावे बाजूला सारून आजीमाजी मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर येऊन महाराष्ट्राची राजकीय परंपरा कायम ठेवणार का हे या कार्यक्रमानंतर कळणार आहे.