मुंबई: मध्य रेल्वेवर आज (रविवार) दोन विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील सेवा किमान सहा तासांसाठी बंद असेल. मध्य रेल्वेवरील वाहतुकीस अडथळे ठरणाऱ्या 3 रेल्वे फाटकांपैकी ठाकुर्ली येथे उड्डाणपूल बांधण्याचे काम आज हाती घेण्यात येणार आहे.
पहिला विशेष ब्लॉक अप आणि डाऊन फास्ट मार्गावर सकाळी 9.15 ते दुपारी 3.15 पर्यंत असेल.
तर दुसरा विशेष ब्लॉक अंबरनाथ-बदलापूरमधील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी घेण्यात येणार आहे. त्यामुळे अंबरनाथ आणि वांगणीतील अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 9.30 ते दुपारी 2 पर्यंत ब्लॉक असणार आहे.
या गाड्या रद्द
आजच्या या विशेष मेगाब्लॉकमुळे कल्याण-ठाकुर्ली आणि अंबरनाथ-बदलापूरमार्गे धावणाऱ्या अनेक एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.
12140 नागपूर-सीएसटी मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस आज नाशिकपर्यंतच धावेल, संध्याकाळी 6.30 वाजता नाशिकहून नागपूरला रवाना होईल.
12123 पुणे- सीएसटी मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस रद्द
12110 मनमाड सीएसटी पंचवटी एक्स्प्रेस रद्द
12118 मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेस रद्द