चार सेकंद.. एटीएमची तोडफोडही न करता लाखोंची लूट
एबीपी माझा वेब टीम | 23 Jun 2017 09:13 PM (IST)
मिरा रोड : फक्त चार सेकंदात एटीएमची कुठलीही तोडफोड न करता चोरट्यांनी लाखोंची रक्कम लुटल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईजवळच्या मिरा रोडमधून समोर आला आहे. विशेष म्हणजे ज्या खात्यातून पैसे काढले जात होते, त्या खात्यात रक्कम काढल्याची एन्ट्रीही होत नव्हती. कमलेश कुशवाह आणि हिमांशु शर्मा या जोडगोळीने एटीएममधून लाखोंची रक्कम काढली. मात्र त्याची खातेदाराला कधीच खबर लागली नाही. मात्र दररोज होणाऱ्या व्यवहारांपेक्षा एटीएममधून जास्त रक्कम निघत असल्याचं बँकेला समजल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. आरोपी कमलेश कुशवाह आणि हिमांशु शर्मा यांना नयानगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एखाद्या हायटेक इंजिनीअरलाही चक्रावून टाकणारी आरोपींची शक्कल पाहून, पोलीसही थक्क झाले आहेत. मात्र आरोपींना एवढी तांत्रिक माहिती पुरवली कोणी, त्यांचा गुरु आहे तरी कोण, याचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभ ठाकलं आहे. पाहा व्हिडिओ :