मुंबई: मुंबईत काल मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्साह साजरा करण्यात आला. मात्र या दहीहंडीत दोन गोविंदांना आपला जीव गमवावा लागला. तर तब्बल 117 गोविंदा जखमी झाले.
जखमींपैकी 7 जणांना रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलंय, तर उर्वरीत गोविंदांना उपचार करून सोडण्यात आलं.
दरम्यान, पालघर जिल्ह्यामध्ये थर लावताना पडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. रोहन गोपीनाथ किणी असं मृत गोविंदाचं नाव आहे. थरावर थर लावून झाल्यावर रोहनला फीट आली आणि त्याचा मत्यू झाला.
दुसरीकडे नवी मुंबईतल्या ऐरोलीमध्ये शॉक लागून एका गोविंदाचा मृत्यू झाला. जयशे शरले असं या गोविंदाचं नाव आहे. मंडळाच्या ठिकाणी जमिनीवर पडलेल्या वायरचा शॉक लागून ही घटना घडली. शिवसेना नरसेवक विजय चौगुले यांनी या हंडीचं आयोजन केलं होतं.
संबंधित बातम्या
नवी मुंबईत विजेच्या धक्क्याने 21 वर्षीय गोविंदाचा मृत्यू
पालघरमध्ये 21 वर्षीय गोविंदाचा थरावरुन पडून जागीच मृत्यू
मराठा लाईट इन्फंट्री सेंटरमध्ये जवानांनी फोडली दहीहंडी!
दहीहंडीदरम्यान 117 गोविंदा जखमी, दोघांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Aug 2017 07:39 AM (IST)
मुंबईत काल मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्साह साजरा करण्यात आला. मात्र या दहीहंडीत दोन गोविंदांना आपला जीव गमवावा लागला. तर तब्बल 117 गोविंदा जखमी झाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -