मुंबई : अंधेरीमधील कामगार रुग्णालयात सोमवारी आगीची दूर्घटना घडली. या दूर्घटनेत आठ जण मृत्यूमुखी पडले. या अग्नितांडवाचे कारण समोर आले आहे. सोमवारी रुग्णालयातील चौथ्या मजल्यावर एसी दुरुस्तीचे काम सुरु होते. त्यावेळी ठिणगी पडून आग भडकल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

एसी दुरुस्तीचे काम सुरु असताना, कामगारांच्या निष्काळजीपणामुळे आग लागली असल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी एसी दुरुस्ती करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरसह दोघांना अटक करण्यात आली आहे. तर इतर दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सोमवारी अंधेरी एमआयडीसी भागात संध्याकाळी भीषण अग्नितांडव पाहायला मिळाले होते. 'ईएसआयसी' कामगार रुग्णालयात भीषण आग लागली होती. अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी तब्बल दोन तास अथक प्रयत्न केल्यानंतर रुग्णालयात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले व आग विझवली. या आगीत आठ जणांना आपले प्राण गमावाले लागले. तर 150 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

संबधित बातम्या : 

अंधेरीतील कामगार रुग्णालयात तीन दिवसांत दुसऱ्यांदा आग

कामगार रुग्णालय आग : काचेच्या भिंतींची चकाकी जीवावर बेतली

अंधेरीतील कामगार रुग्णालयाच्या अग्नितांडवात सहा जणांचा मृत्यू