अंधेरीतील कामगार रुग्णालयात तीन दिवसांत दुसऱ्यांदा आग
एबीपी माझा वेब टीम | 19 Dec 2018 08:28 PM (IST)
अंधेरीतील कामगार रुग्णालयात तीन दिवसांत दुसऱ्यांदा आग लागण्याची घटना घडली आहे.
मुंबई : अंधेरीतील कामगार रुग्णालयात तीन दिवसांत सलग दुसऱ्यांदा आग लागण्याची घटना घडली आहे. रुग्णालयाच्या तळमजल्यावर ही आग लागली असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. शॉर्ट सर्किटमुळे मीटर बॉक्समध्ये आग लागल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. आग अद्याप आटोक्यात आलेली नाही. दोन दिवसांपूर्वी याच रुग्णालयातील चौथ्या मजल्यावर असलेल्या ऑपरेशन थिएटरजवळ शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. या आगीत आठ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला दोन दिवस होत नाहीत तोवर आज पुन्हा एकदा या रुग्णालयाच्या तळमजल्यावर आग लागली आहे. संबधित बातम्या :