मुंबई : मुंबईत नवोदित अभिनेत्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 28 वर्षीय राहुल दीक्षितने आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.


पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आहे. राहुलने काही हिंदी मालिका आणि नाटकांमध्ये काम केल्याची माहिती आहे. मात्र त्याच्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.


विशेष म्हणजे मृत्यूच्या आदल्या रात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास राहुलने फेसबुक लाईव्हही केलं होतं. या लाईव्हमध्ये दोन तरुणी डान्स करताना दिसत आहेत. रुपाली कश्यप हे प्रोफाईल या लाईव्हमध्ये टॅग करण्यात आलं आहे.



राहुल स्ट्रगलिंग अभिनेता असल्यामुळे नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज, पोलिसांनी वर्तवला आहे. राहुलचे वडील महेश दीक्षित यांनी फेसबुकवर 'तू आम्हाला सोडून का गेलास?' असा आर्त प्रश्न उपस्थित केला आहे.